Home ब्रेकिंग न्यूज Chandrashekhar Bawankule And Raj Thackeray : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Chandrashekhar Bawankule And Raj Thackeray : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

0
Chandrashekhar Bawankule And Raj Thackeray : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
Chandrashekhar Bawankule And Raj Thackeray

मुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असले, तरी ही केवळ एक ‘सदिच्छा भेट’ होती, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय आणि त्यानंतर मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात काही वेळा दूरध्वनीवरून चर्चा झाली होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्याकडे चहा पिण्यासाठी येण्याचे बावनकुळे यांनी कबूल केले होते. त्यानुसार गुरुवारी राज ठाकरे यांनी वेळ दिल्याने ही भेट घेतल्याचे महसूलमंत्र्यांनी स्पष्ट केले.

https://prahaar.in/2026/05/07/mumbais-water-metro-norways-marine-technology-for-mumbais-water-metro/

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “मी राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मंत्री झाल्यापासून ही भेट प्रलंबित होती. त्यांनी मला चहापानासाठी वेळ दिला आणि आमची अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. त्यांनी माझा यथोचित सन्मान केला. ही भेट पूर्णपणे अनौपचारिक होती.

https://prahaar.in/2026/05/07/moment-hantavirus-evacuees-land-in-amsterdam-and-are-escorted-to-hospital/

नेमकी काय चर्चा झाली?

या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा अन्य कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली का, असे विचारले असता त्यांनी थेट नकार दिला. “आमची मैत्री जुनी आणि अबाधित आहे. एक मित्र म्हणून मी त्यांना भेटायला आलो होतो, यात कोणताही राजकीय अर्थ शोधण्याची गरज नाही,” असेही त्यांनी सांगितले.