मुंबई : गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरवार ३० एप्रिल रोजी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांना १० टक्के भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.
या बैठकीला नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे मिलिंद बोरीकर, शिव उद्योग सेनेचे उदय सावंत आणि पत्रा चाळीतील सर्व रहिवाशी उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/04/30/breaking-news-bachchu-kadu-will-join-shindes-shiv-sena-today/
पत्रा चाळ रहिवाशांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न म्हाडाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्यानंतरही काही रहिवाशांनी या घरांचा ताबा घेतला नव्हता. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
https://prahaar.in/2026/04/30/big-stir-in-pakistan-suspicious-accidental-death-of-top-jaish-e-mohammed-commander-maulana-salman-azhar/
याशिवाय लिज फेव्हरमध्ये वाढवून देणेबाबत प्रलंबित असलेला विषयाबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील निर्णय घेतला जाईल असेही या बैठकीत शिंदे यांनी स्पष्ट केले.