मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर आज म्हणजेच गुरुवार ३० एप्रिल रोजी बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, त्यानंतर त्यांना विधान परिषदेची संधी देऊ अशी अट घालण्यात आली होती. यावर कार्यकर्त्यांशी चर्चा करून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतला.
झेंडा बदलला तरी अजेंडा तोच आहे :
https://prahaar.in/2026/04/30/mhada-decides-to-give-10-percent-rent-hike-to-patra-chawl-residents/
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. आज ते पुन्हा स्वगृही आलेत. असं म्हणत त्यांचं स्वागत केलं.
https://prahaar.in/2026/04/30/big-stir-in-pakistan-suspicious-accidental-death-of-top-jaish-e-mohammed-commander-maulana-salman-azhar/
नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
एक कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांसाठी झटणारा, दिव्यांगासाठी लढणारा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. बच्चू कडू यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. जेव्हा जेव्हा आंदोलन मोर्चे निघाले तेव्हा त्यांची ताकद पाहिली. शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढला, कर्जमाफीचा निर्णय घेऊन त्या आंदोलनाला यश आले. दिव्यांगासाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. आज त्यांचे शिवसेनेत स्वागत करतो. बच्चू कडू मूळचे शिवसैनिकच आहेत. २५ वर्ष प्रहार संघटनेचे काम केले आणि त्यानंतर आज पुन्हा स्वगृही आलेत. मुद्दे, ध्येयधोरणे, गोरगरिबांना न्याय देणारे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी सत्तेचे बळ लागते. बच्चू कडू आणि शिवसेना समीकरण नवीन नाही. लढवय्या कार्यकर्ता आज आपल्यात आलेत. आपली लढाई विचारांची आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्याची भूमिका माझीही आणि त्यांचीही आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा होतो असं सांगत एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांचे पक्षात स्वागत केले.