– रितू तावडे यांचा गृहप्रवेश लांबणीवर
मुंबई ( विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापौर पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रितू तावडे यांनी अद्यापही राणीबागेतील महापौर निवासस्थान राहण्यास गेलेले नाही. मागणीला साडेतीन वर्षांपासून महापौर निवासस्थान बंद असल्यामुळे या निवासस्थानाची डागडुजी तसेच सुधारणा केली जात आहे. त्यामध्ये सध्याच्या निवासस्थानांमध्ये सुधारणा करतानाच दोन अतिरिक्त शौचालयांची सुविधा तसेच तळ मजल्यावरील सभास्थानाचे वापराच्या खोलीमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महापौरांनी ही सुधारणा करून घेण्यासाठी आपला गृहप्रवेश लांबणीवर टाकला असून आपल्यासह अडीच वर्षांनंतर येणाऱ्या नवीन महापौरांसाठीही सुसज्ज वास्तू राहावी याचा विचार करत विद्यमान महापौरांनी एकदाच नुतनीकरणाचा आराखडा बनवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार या वास्तूंचे नुतनीकरण करण्यात येत आहे.
https://prahaar.in/2026/04/28/kolhapur-women-abuse-case-shocking-parthwada-case-repeated-in-kolhapur-video-of-abusing-a-young-woman-goes-viral/
https://prahaar.in/2026/04/28/iran-america-war-it-is-impossible-to-threaten-iran-russia-warns-america/
बंगल्यात होणार अशी कामे
बंगल्याच्या अंतर्गत फर्निचरची पूर्णतः दुरुस्ती करणे
सर्व शौचालयांचे नवीन टाईल्स, फिक्स्चर्स, डब्ल्यूसी बसवून नूतनीकरण करणे
पहिल्या मजल्यावरील बेडरुमसाठी अतिरिक्त शौचालयाची व्यवस्था करणे
तळमजल्यावर अतिरिक्त बेडरुमची व्यवस्था करणे.
पुरातन पद्धतीची झुंबरे व प्रकाशयोजना करणे
तळमजल्यावरील सभागृहाचे बैठकीच्या खोलीमध्ये रुपांतर करणे
अत्याधुनिक सोयीसुविधांसह स्वयंपाकगृहाचे पूर्णपणे नूतनीकरण करणे
तळमजल्यावर इटालियन मार्बल्सनी संपूर्ण फरशीचे नूतनीकरण करणे
पुरातन पद्धतीचे व्हेनेशीयन लावणे
तळमजल्यावर अतिरिक्त शौचालय बांधणे