Home ब्रेकिंग न्यूज BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनणार कार्यकारी अभियंता

BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनणार कार्यकारी अभियंता

0
BMC News : मुंबई महापालिकेचे १६५ सहायक अभियंते बनणार कार्यकारी अभियंता
BMC

– स्थापत्य शहर समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता पदाची अनेक पदे रिक्त असून सध्या केवळ ४ कार्यकारी अभियंतेचे कायम पदावर आहेत. त्यामुळे या रिक्त जागा भरण्याची मागणी मागील अनेक महिन्यांपासूनची असून अखेर ही पदे आता पदोन्नतीने भरण्यात येत आहे. मुंबई महापालिकेतील १६५ सहायक अभियंत्यांना कार्यकारी अभियंतापदी बढती देण्यात येत असून या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थापत्य शहर समितीच्यावतीने मंजुरी देण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/04/28/breaking-news-temporary-break-on-marathi-compulsion-shashank-rao-claims-that-the-decision-for-rickshaw-taxi-drivers-has-been-postponed-till-august/

मुंबई महापालिकेतील कार्यकारी अभियंता (स्थापत्य ) या संवर्गातील १५० रिक्तपदे, ०९ संभाव्य रिक्त पदे आणि ०६ परिणाम स्वरुप रिक्तपदे अशाप्रकारे एकूण १६५ रिक्त पदे ही सहायक अभियंता (स्थापत्य) संवर्गातून पदोन्नतीने भरली जात आहे. ही पदे पदोन्नतीने भरण्यासाठी सेवा ज्येष्ठनेनुसार पदांची यादी तयार करून याच्या मंजुरीसाठी स्थापत्य शहर समितीपुढे मंजुरीसाठी प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थापत्य शहर समिती अध्यक्ष यामिनी जाधव यांनी मंजुरी दिली आहे. या प्रस्तावाला आता महापालिकेची मंजुरी अपेक्षित असून येणाऱ्या सभेत तातडीचे कामकाज म्हणून हा प्रस्ताव सादर करून याला मंजुरी प्राप्त झाल्यानंतर अभियंत्यांना पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे.

https://prahaar.in/2026/04/28/kolhapur-women-abuse-case-shocking-parthwada-case-repeated-in-kolhapur-video-of-abusing-a-young-woman-goes-viral/

या सर्व अभियंत्यांना लोकसभा निवडणू आचारसंहितेपूर्वी पदोन्नती मिळणे आवश्यक होते, परंतु लोकसभा आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागून संपुष्टात आल्यानंतरही पात्र अभियंत्यांना कोणत्याही प्रकारचा पदोन्नतीचा लाभ देण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्यामुळे ते यापासून वंचित राहिले होते.