मुंबई (विशेष प्रतिनिधी)
अमेरिकेच्या येल विद्यापिठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थी हा , विसाव्या शतकातील म्हणजे सन १९३० ते १९८० या कालावधीत मुंबई बंदरमधील गोदींचा विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार, नागरी परिवर्तन आणि मुंबईतील माथाडी कामगारांचा सामाजिक, आर्थिक व राजकीय इतिहास आणि शहराच्या विकासातील त्यांचे योगदान या संदर्भातील महानगरपालिका व तिच्या वैधानिक आणि विशेष समित्यांचा कामकाजाचा अभ्यास करणार आहे. अभिलेख पाहण्यास परवानगी देणे आणि त्याकरिता निश्चित केलेले शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात येणार आहे
https://prahaar.in/2026/04/27/bmc-news-municipal-corporation-stalls-licenses-will-be-in-the-name-of-mother-and-father-after-the-death-of-an-unmarried-person/
आनंद यांच्या या अर्जाच्या समर्थनार्थ, अमेरिका मधील येल विद्यापीठाच्या इतिहास विभागातील लॉरेन बेंटन, पदवीधर अभ्यास संचालक यांनी दिलेले विद्यार्थी नोंदणी पत्र सोबत जोडले आहे. ही सर्व कागदपत्रे तपासण्यासाठी, जुने अभिलेख तपासण्यासाठी कोणत्याही सदस्यासाठी विनामूल्य व इतर कोणत्याही व्यक्तीसाठी पन्नास नवे पैसे इतकी किंवा महानगरपालिका निश्चित करील अशी, दोन रुपयांहून अधिक नसेल इतकी फीची रक्कम दिल्यानंतर निरिक्षणासाठी उपलब्ध असेल असे अशाप्रकारची परवानगी प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.