भारत-नेपाळ सीमेवरील प्रवास आणि व्यवहारांमध्ये मोठे बदल झाले असून नेपाळ सरकारने भारतीय प्रवाशांसाठी नवीन व कडक नियम लागू केले आहेत. या नियमांचा थेट परिणाम सीमापार प्रवास करणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या भारतीय नागरिकांवर होणार आहे.
https://prahaar.in/2026/04/23/west-bengal-election-2026-bjps-victory-will-be-celebrated-in-west-bengal-on-may-4-pm-narendra-modi/
खरेदीसंदर्भातही नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नेपाळमधून १०० नेपाळी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल आणल्यास कस्टम ड्युटी भरावी लागणार आहे. या बदलांचा सर्वाधिक परिणाम सीमावर्ती भागात राहणाऱ्या नागरिकांवर होणार आहे. अनेक कुटुंबांचे सदस्य भारत आणि नेपाळ या दोन्ही देशांत विखुरलेले असल्यामुळे त्यांचा दैनंदिन व्यवहार यावर अवलंबून आहे. दक्षिण नेपाळातील अनेक नागरिक स्वस्त वस्तू खरेदीसाठी बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये जात असत; मात्र आता त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागत आहे, अन्यथा माल जप्त केला जात आहे.
https://prahaar.in/2026/04/23/india-america-relations-reaching-an-agreement-on-trade-issues-with-india-is-not-easy-jamieson-greer/