Thursday, April 23, 2026

Sharad Pawar : शरद पवार रुग्णालयातून घरी, प्रकृती स्थिर

Sharad Pawar : शरद पवार रुग्णालयातून घरी, प्रकृती स्थिर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने गुरुवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले असून, सध्या ते त्यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी विश्रांती घेत आहेत.

शरद पवार यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्याची माहिती पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. "शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन ते आपल्या निवासस्थानी आराम करीत आहेत. पवार साहेबांना पूर्णतः आराम पडावा आणि त्यांचा झंझावात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसावा, अशी प्रार्थना आपण सर्व करूया," अशा शब्दांत आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >