Home महाराष्ट्र ठाणे Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल

Central Railway : मध्य रेल्वे सलग तिसऱ्या दिवशी ४५ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल
Central Railway

ठाणे : डोंबिवली स्थानकावर रिकाम्या रेल्वेचा डब्बा घसरला आणि संपूर्ण मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, त्या दिवसापासून लोकल या उशिराने धावत आहेत, आज तिसरा दिवस उजाडला तरी लोकल चे वेळापत्रक सुधारलेले दिसत नाही आहे, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोणताही अधिकृत मेगाब्लॉक जाहीर केलेला नसताना लोकलची वेळ बिघडल्यामुळे लोकलचा पुरता बोजवारा उडाला आहे.

https://prahaar.in/2026/04/20/mumbai-local-empty-local-coach-derails-in-dombivli-train-schedule-disrupted/

सोमवारची ती दुर्घटना आणि तीन दिवस मनस्ताप

सोमवारी डोंबिवली स्थानकात कळवा कारशेडमधून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या रिकाम्या लोकलचा एक डबा रुळावरून घसरला, आणि याच घटनेनंतर मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, काही लोकल रद्द झाल्या तर काही लोकलचा मार्ग बदलावा लागला, कमी काही तासातच पूर्ण होईल असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते परंतु काम पूर्ण झाले तरीही अद्याप रेल्वेचे वेळापत्रक सुधारलेले नाही. कल्याण ते ठाणे दरम्यान स्थानकांवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळत असून गाड्या अत्यंत धीम्या गतीने धावत आहेत.

मेगाब्लॉकच्या वावड्या उठल्या

सकाळची पहिलीच लोकल कासाराहून पाऊण तास उशिराने धावली. मिळालेल्या माहितीनुसार आसनगाव दरम्यान लोकल फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली होती. मात्र ठाण्यापासून पुन्हा ती स्लो ट्रॅकवर चालवण्यात आली. जेव्हा प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून मेगाब्लॉकचे कारण पुढे करण्यात आले.

https://prahaar.in/2026/04/21/diagnostic-center-in-borivalis-punjabi-galli-handed-over-to-a-private-entity/

प्रवाशांचा तीव्र संताप

सलग तीन दिवस मध्य रेल्वेची वाहतूक गर्दीच्या वेळेला विस्कळीत असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. या त्रासामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. आमच्या वेळेला किंमत नाही का ? असा सवाल प्रवासी विचारू लागले आहेत.