शिधावाटप भरारी पथकाचे छापासत्र; एकाला बेड्या, १४० सिलिंडर घेतले ताब्यात
मुंबई : व्यावसायिक वापरासाठीच्या नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गॅस सिलिंडरचा मोठा साठा बाळगणाऱ्या ठाण्यातील ‘डॉमिनोज पिझ्झा’ या नामांकित उपाहारगृहावर शिधावाटप भरारी पथकाने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला. ठाण्यातील वंडर मॉल परिसरातील या स्टोअरमधून सुमारे ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचा अवैध सिलिंडर साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
https://prahaar.in/2026/04/15/lpg-scam-police-foil-plot-to-black-market-lpg-cylinders/
https://prahaar.in/2026/04/16/nanded-shaken-tragic-death-of-4-schoolchildren-after-drowning-in-stagnant-water-in-a-drain/
जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा
या बेकायदेशीर साठवणुकीप्रकरणी एका संशयित आरोपीला ताब्यात घेऊन चितळसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. संबंधित आरोपीविरुद्ध ‘जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५’ मधील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिक आस्थापनांमध्ये घरगुती किंवा नियमबाह्य पद्धतीने गॅसचा वापर करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा साठ्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही पथकाने वर्तवली आहे.