बाजार समित्यांसाठी राज्य सरकारचे नवे नियम; ५० किलोची मर्यादा बंधनकारक
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये राबणाऱ्या माथाडी कामगारांच्या आरोग्याचा विचार करून राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कांदा, बटाटा व इतर शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिले आहेत. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांचा भार उचलणाऱ्या कामगारांचा भार काहीसा हलका होणार आहे.
https://prahaar.in/2026/04/16/thane-illegal-cylinder-storage-cylinder-stock-worth-%e2%82%b94-59-lakh-seized-from-dominos-pizza/
त्यानुसार, बाजार समित्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार समित्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये शेतमालाच्या गोणीचे वजन ५० किलोपर्यंतच ठेवण्याबाबत जनजागृती करावी, व्यापाऱ्यांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या गोण्या भरू नयेत, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात याव्यात, या नियमाबाबत बाजार समिती आवारात पुरेशी प्रसिद्धी करण्यात यावी, जेणेकरून सर्वांना याची कल्पना येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/04/16/shyam-steel-and-jw-global-group-invest-in-the-state/
अंमलबजावणीची जबाबदारी निश्चित
या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी बाजार समितीचे सचिव, जिल्हा उपनिबंधक आणि पणन संचालक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही वजन मर्यादा लागू करताना बाजार समितीचे दैनंदिन कामकाज प्रभावित होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देशही सरकारने दिले आहेत. या प्रक्रियेचा वेळोवेळी अहवाल शासनाला सादर करावा लागणार आहे