चटई क्षेत्रफळात वाढ; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा निर्णय
मुंबई : राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. बदलती जीवनशैली आणि वाढत्या गरजा लक्षात घेऊन शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात (कार्पेट एरिया) वाढ करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी जाहीर केला. या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता अधिक आधुनिक आणि प्रशस्त घरे उपलब्ध होणार आहेत.
सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार विविध गटांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे क्षेत्रफळ नव्याने निश्चित करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) निर्गमित केला असून, उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेनंतर यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/04/16/what-is-womens-reservation-bill-how-will-women-benefit-from-it-read-women-s-reservation-bill-explainer/
https://prahaar.in/2026/04/16/thane-illegal-cylinder-storage-cylinder-stock-worth-%E2%82%B94-59-lakh-seized-from-dominos-pizza/
आधुनिक सुविधांवर भर
केवळ जागेत वाढ न करता सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. प्रत्येक खोलीत इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधेसाठी स्वतंत्र पॉइंट्स दिले जातील. बहुमजली इमारतींमध्ये जिने, कॉरिडॉर आणि सामाईक सोयींसाठी स्वतंत्र जागा राखून ठेवली जाईल, जेणेकरून घराच्या मुख्य क्षेत्रफळावर त्याचा परिणाम होणार नाही. हा निर्णय केवळ नव्याने सुरू होणाऱ्या बांधकाम प्रकल्पांसाठी लागू असेल. सध्या बांधकामाधीन असलेल्या किंवा पूर्ण झालेल्या इमारतींच्या रचनेत कोणताही बदल केला जाणार नाही. ज्या कर्मचाऱ्यांना आधीच निवासस्थाने वाटप झाली आहेत, त्यांच्या श्रेणीमध्ये कोणताही बदल होणार नाही.