मुंबई : भारतातील अनेक महामार्गांवर टोल वसुली सुलभ करण्यासाठी फास्टॅग चा वापर केला जातो. इंधनाची बचत, वेळेची बचत, आणि पद्धतशीर टोलची वसुलीसुद्धा, याच टोलवसुलीमध्ये सुद्धा लोक जुगाड करून आपले पैसे वाचवत आहेत. वाहनचालक पैसे वाचवण्यासाठी फास्टॅग च्या स्कॅनर मध्ये जुगाड करत आहेत. सर्रासपणे चाललेली ही गोष्ट पटकन कोणाच्या लक्षात येण्यासारखी नसते त्यामुळे अनेक गैरप्रकार टोल वसुलीद्वारे केले जात आहेत.
https://prahaar.in/2026/04/15/flipkart-uber-partnership-earn-supercoins-on-rides-expansion-of-the-rewards-ecosystem/
अशी केली जाते गडबड
काचेवर स्कॅनर न चिटकवणे : अनेक वाहनांवर, काचेवर फास्टॅग बऱ्याचवेळी नसतो. तो हातात धरून किंवा प्लॅस्टिकमध्ये असतो, त्यामुळे टोल वसुली करणाऱ्यांना तो टॅग कोणत्या गाडीचा आहे यावर त्यांची चटकन नजर जात नाही.
दुसऱ्या गाडीचा टॅग वापरला जातो : कारसाठी असलेला फास्टॅग मोठ्या वाहनांवर म्हणेजच ट्रक किंवा बस वर चिटकवून कमी टोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.
फास्टॅग झाकून ठेवला जातो : कॅमेऱ्या टॅग स्कॅन करू शकणार नाही अशा पद्धतीने टॅगवर सेलोटेप किंवा इतर काहीतरी लावले जाते, जेणेकरून तांत्रिक बिघाडाचे कारण देऊन कमी तोल भरण्याचा प्रयत्न केला जातो.
https://prahaar.in/2026/04/15/share-market-update-stock-market-rallies-sensex-jumps-1264-points/