Home ब्रेकिंग न्यूज Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंसमोर भिडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवले

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंसमोर भिडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवले

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंसमोर भिडणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हटवले

 सोलापूर आणि माढ्यातील शिवसेनेची कार्यकारिणी बरखास्त

मुंबई : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोलापूर दौऱ्यात पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरघोड्यांचे दर्शन उघडपणे घडल्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. आढावा बैठकीत खासदारांसमोरच आपापसात भिडणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याची गंभीर दखल घेत, सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुखांपासून ते शाखाप्रमुखांपर्यंतची संपूर्ण कार्यकारिणी मंगळवारी रात्री उशिरा बरखास्त करण्यात आली आहे.

https://prahaar.in/2026/04/15/us-iran-war-impact-onions-to-be-converted-into-powder/

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोलापूर आणि माढ्याचा आढावा घेण्यासाठी दौरा आयोजित केला होता. मात्र, या बैठकीदरम्यान पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली. जिल्हाप्रमुखांच्या निवडीपासून ते कामाच्या पद्धतीपर्यंत अनेक गंभीर आक्षेप घेतानाच, पदाधिकाऱ्यांमध्ये खासदारांच्या उपस्थितीतच शाब्दिक चकमक आणि बाचाबाची झाली. स्थानिक नेत्यांमधील हा वाद थांबवण्यासाठी श्रीकांत शिंदे यांनी त्यावेळी सूचना दिल्या होत्या, मात्र दौरा संपताच संपूर्ण जिल्हा संघटनाच विसर्जित करून पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुलाखतींनंतरच नव्या नियुक्त्या

शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, पक्षाचे मुख्य सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ही बरखास्तीची कारवाई केली आहे. यामध्ये शिवसेना, युवा सेना, महिला सेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या कार्यकारिणींचा समावेश आहे. आता पुढील काळात या पदांसाठी संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत रीतसर मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या प्रक्रियेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नवीन नियुक्त्या केल्या जातील, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.

https://prahaar.in/2026/04/15/pakistans-inefficient-healthcare-system-331-children-were-given-aids-injections-with-a-single-needle-many-died/

कामगिरीच्या जोरावर मिळणार पदे

कार्यकारिणी बरखास्त झाली असली तरी, शिवसैनिकांनी पक्षांतर्गत वाद बाजूला ठेवून विशेष सखोल पुनरीक्षण (एआयआर) मोहिमेत सक्रिय सहभागी व्हावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या मोहिमेत जो कार्यकर्ता चांगली कामगिरी करेल, त्याच्या नोंदी घेतल्या जाणार असून कामगिरीच्या जोरावरच नवीन पदे बहाल केली जातील, असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.