मुंबई : दक्षिण मुंबईतील जे जे उड्डाणपूलाखालील भागात मागील काही वर्षांपासून अतिक्रमण होऊन मोठ्याप्रमाणात अस्वच्छता पसरलेली आहे. उड्डाणपुलाखाली अतिक्रमणांसह साचलेली कचरा आणि त्यापासून पसरलेली दुर्गंधीची जळमटेच आता महापालिकेने हटवून या पुलाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीतील पूलाच्या खालील भाग साफ करण्यात आल्याने कधी नव्हेतर जे जे उड्डाणपूलाच्या खाली भाग जळमटे दूर केल्याने सुंदर दिसू लागला आहे.
मुंबई महापालिकेच्यावतीने फेरीवाल्यांसह पदपथांवरील अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेण्यात आल्यानंतर महापालिकेच्या बी विभागाच्यावतीनेही डोंगरी,मोहमद अली रोड, मस्जिद बंदर परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे. बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी महापालिका परिमंडळ एकच्या उपायुक्त चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मागील आठवड्यापासून या मुस्लिम बहुल परिसरात जिथे महापालिकेच्यावतीने कारवाई करण्याची हिंमत दाखवली जात नाही तिथे आता कारवाई केली जात आहे. त्यामुळे फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये शरीफ देवजी स्ट्रीट अर्थात चकला स्ट्रीट येथील वाढीव बांधकामे तसेच पदपथ अडवून केलेले बांधकामे हटवण्यास सुरुवात केली आहे. एवढे मस्जिद बंदर येथीलही बांधकामे आणि अतिक्रमण हटवतानाच मकदुम अली महिमी उड्डाणपूल अर्थात जे जे उड्डाणपूलाखाली सर्व अतिक्रमणांपासून तो तिथे वर्षांनुवर्षे जमा झालेला कचरा हटवून पुलाखालील परिसर स्वच्छ सुंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या बी विभागाच्या हद्दीत पुलाखालील परिसरात जो बकालपणा दिसत होता, तो बी विभागाचे सहायक आयुक्त योगेश देसाई यांनी आपल्या चमुसह दूर करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता वाहनातून प्रवास करतानाही पुलाखालील परिसराचे स्वच्छ आणि सुंदर दर्शन होताना दिसणार आहे. तसेच पुलाखालील भागांमधील पदपथांवर अनावश्यक कठडे बांधून ठेवले आहेत तेही तोडून टाकण्यावर भर दिला आहे.
It's good decision of bmc so look at jogeshwari and andheri
Comments are closed.