Home ताज्या घडामोडी Holi Special Kokan Train : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आजपासून दादर – रत्नागिरी विशेष गाडी धावणार

Holi Special Kokan Train : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आजपासून दादर – रत्नागिरी विशेष गाडी धावणार

Holi Special Kokan Train : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! आजपासून दादर – रत्नागिरी विशेष गाडी धावणार

मुंबई : कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.(Holi Special Kokan Train) मध्य रेल्वेने दादर-रत्नागिरी मार्गावर होळीसाठी ११ मार्च पासून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीच्या एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित धावणार आहे.

Youth Fitness And Weight Loss : फिटनेसच्या नादात १८ वर्षीय तरुणी जीवाला मुकली!

गाडी क्र. ०११३१ दादर रत्नागिरी होळी विशेष गाडी ११, १३ व १६ मार्च, २०२५ दुपारी २:५० ला सुटून रात्री ११:४० ला रत्नागिरीला पोहोचेल. परतीची गाडी क्र. ०११३२ रत्नागिरी दादर गाडी १२, १४ आणि १७ मार्च २०२५ पहाटे ४:३० ला सुटून दुपारी १:२५ ला दादरला पोहोचेल. गाडीला एकूण १६ डबे असतील. त्यातील सर्वसाधारण श्रेणीचे १४, तर एसएलआर २ डबे असतील. (Holi Special Kokan Train) ही विशेष गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.