Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहापालिका अर्थसंकल्पाचा आकडा प्रत्यक्षात सादर केल्याच्या तुलनेत सुधारीतमध्ये वाढता वाढता वाढे..

महापालिका अर्थसंकल्पाचा आकडा प्रत्यक्षात सादर केल्याच्या तुलनेत सुधारीतमध्ये वाढता वाढता वाढे..

सन २०२१- २२नंतरच सुधारीतच्या नावावर वाढवला गेला अर्थसंकल्पाचा फुगा

मुंबई(सचिन धानजी) – मुंबई महापालिकेचे आजवर जेवढे अंदाजित अर्थसंकल्प मांडले गेले, ते अर्थसंकल्प सुधारीत करताना त्याचा प्रत्यक्षात आकार कमी झालेला पहायला मिळत होता, परंतु आता मागील सन २०२१-२२ पासून प्रत्यक्षात सादर केलेल्या अंदाजित अर्थसंकल्पाच्या तुलनेत सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा वाढलेला पहायला मिळत आहे. चालू अर्थसंकल्पाचा आकडा सादर करताना ५९,९५४.७५ कोटी रुपये जाहीर केला होता, परंतु प्रत्यक्षात तो आकडा ६५,१८०.७९ कोटींवर वाढवण्यात आला. मात्र, याच अर्थसंकल्पाचा आकडा सुधारीत करताना ही रक्कम ६४,२३८ कोटी रुपये एवढी दर्शवली गेली.

त्यामुळे प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत दाखवल्या गेलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा सुमारे ५ हजार कोटींनी जास्त आहे आणि सुधारीत पेक्षा ४३०० कोटींनी जास्त असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या आकड्याच्या तुलनेत सुधारीत केलेले आकडे वाढता वाढता वाढतच जात असल्याचे पहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ भूषण गगराणी यांनी सन २०२५-२६चा अर्थंसकल्पीय अंदाज सादर केला. या सन २०२५ २६ या आर्थिक वर्षांत ७४,४२७.४१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. सन २०१६- १७ पासून ते सन २०२०- २१ या कालावधीमध्ये प्रत्यक्षात आयुक्तांनी सादर केलेले अर्थसंकल्प आणि सुधारीत केलेल्या अर्थसंकल्पात तफावत दिसून आली आहे. प्रत्यक्ष सादर केलेल्या अर्थसंकल्पातील रकमेपेक्षा सुधारीत केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा कमी झाल्याचे दिसून येत होते.

पायाभूत सुविधांवर भर; बेस्टला भरीव मदतीची गरज

परंतु सन २०२१- २२ पासून प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा हा सुधारीत पेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली आहे आणि तेव्हापासून ते आजपर्यंत सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा वाढतच आहे. उलट प्रत्यक्षात आयुक्तांनी मांडलेल्या अर्थसंकल्पातील आकडा आणि प्रत्यक्षात त्यानंतर दाखवलेला आकडा आणि त्यानंतर सुधारीत केलेल्या अर्थसंकल्पाची आकडेवारी वेगवेगळीच पहायला मिळत आहे.

सन २०२१- २२मध्ये आयुक्तांनी २७,८११ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला, परंतु त्यानंतर या अर्थसंकल्पाचा आकडा ३९,०३८.८३ कोटी रुपये दर्शवला गेला. त्यातून मग हे अर्थसंकल्प सुधारीत करताना याचा आकडा ३९,६१२.७७ कोटी रुपये केले गेले. म्हणजे प्रत्यक्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पातील आकड्यापेक्षा दाखवलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा ११,२२७ कोटींनी अधिक होता आणि सुधारीत अर्थसंकल्पात तो ११,८०१ कोटींनी अधिक वाढला गेला.

त्यानंतर पुढील वर्षी सुधारीत अर्थसंकल्पाचा आकडा कमी झाला आणि सन २०२३-२४मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा ५२,६१९ कोटी रुपयांच्या तुलनेत दाखवल्या गेलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा ५४,२५६.०६ कोटी रुपये होता आणि सुधारीतमध्ये ही रक्कम ५,०११.६० कोटी रुपये दर्शवली गेली. तर सन २०२४- २५मध्ये प्रत्यक्षात सादर केलेल्या ५९,९५४.७५ कोटी रुपये अर्थसंकल्पाच्या तुलनेत दाखवलेल्या अर्थसंकल्पाचा आकडा पाच हजार कोटींनी जास्त होता आणि सुधारीतमध्ये तो ६४,२३८ कोटी रुपये केला गेला.

बेस्ट उपक्रमाला महापालिकेचा हातभार, महापालिका देणार १००० कोटी रुपयांचे अनुदान

मागील नऊ वर्षातील मांडलेला अर्थसंकल्प अंदाज आणि सुधारीत केलेला अर्थसंकल्प

सन २०१६-१७ मध्ये सादर अर्थसंकल्प : ३७,०५२.५२ कोटी रुपये

सुधारित अर्थसंकल्प: २४,७७७.१० कोटी रुपये

सन २०१७-१८ मध्ये सादर अर्थसंकल्प : २५,१४१.५१ कोटी रुपये

सुधारित अर्थसंकल्प: २१,९७८.३४ कोटी रुपये

सन २०१८-१९मध्ये सादर अर्थसंकल्प : २७,२५८.०७ कोटी रुपये

सुधारित अर्थसंकल्प: २२४५६ ५९ कोटी रुपये

सन २०१९-२० मध्ये सादर अर्थसंकल्प : ३०,६९२.५९ कोटी रुपये

सुधारित अर्थसंकल्प: २२,४३५.१२ कोटी रुपये

सन २०२०- २०२१मध्ये सादर अर्थसंकल्प : २८,४८८.३० कोटी रुपये

सुधारित अर्थसंकल्प: २२,५७२.१३ कोटी रुपये

सन २०२१-२२ मध्ये सादर अर्थसंकल्प : २७,८११ कोटी रुपये

दाखवला गेला : ३९०३८.८३ कोटी रुपये

सुधारितअर्थसंकल्प: ३९६१२.७७ कोटी रुपये

सन २०२२-२३ मध्ये सादर अर्थसंकल्प : ४५,९४९.२१ कोटी रुपये

दाखवला गेला : ४५,९४९.२१कोटी रुपये

सुधारीत अर्थसंकल्प : ४३,६०७. १० कोटी रुपये

सन २०२३-२४ मध्ये सादर अर्थसंकल्प : ५२,६१९.०७ कोटी रुपये

दाखवला गेला : ५४,२५६.०७ कोटी रुपये

सुधारीत अर्थसंकल्प : ५०,०११.६० कोटी रुपये

सन २०२४-२५ मध्ये ५९,९५४.७५ कोटी रुपये

दाखवला गेला : ६५१८०.७९

सुधारीत अर्थसंकल्प : ६४,२३८ कोटी रुपये

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -