Home ताज्या घडामोडी रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : भारताने नाग एमके-2 या स्वदेशी तिसऱ्या पिढीच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. राजनाथ सिंह यांनी यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओ, नाग क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी असलेल्यांचे पथक आणि लष्कराचे अभिनंदन केले. राजस्थानमध्ये पोखरण येथे फिल्ड रेंजवर नाग एमके-2 या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली. पोखरणमध्येच नाग क्षेपणास्त्र वाहक आवृत्ती-2 ची पण यशस्वी चाचणी करण्यात आली. या यशस्वी चाचण्यांमुळे नाग एमके-2 रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र लष्कराच्या सेवेत दाखल करण्यासाठी सज्ज झाले आहे.