Home ताज्या घडामोडी लोकल ट्रेनमध्ये उभ्या-उभ्या झोप घ्यायचीय? हा घ्या जुगाड

लोकल ट्रेनमध्ये उभ्या-उभ्या झोप घ्यायचीय? हा घ्या जुगाड

लोकल ट्रेनमध्ये उभ्या-उभ्या झोप घ्यायचीय? हा घ्या जुगाड

मुंबई: भारतीय आणि जुगाड यांचे अनोखे नाते आहे. भारतात त्यातही मुंबईकरांचा कोणत्याही समस्येवर जुगाड काढण्यात कुणी हात धरु शकत नाही. सध्या असाच एक जुगाडू फोटो सोशल मिडियावर ट्रेंड होतोय हा फोटो आहे ट्रेनमध्ये उभ्या-उभ्या झोप काढणाऱ्या एका माणसाचा.

ट्रेनमध्ये उभ्या-उभ्या झोपा काढणाऱ्यांची कमी नाही पण हे करताना इतरांच्या अंगाला झोपेत धक्का लागण्याची काहीवेळा तर जास्त झोप असल्यास पडण्याचीही शक्यता असते. मग अशावेळी एक जुगाड काढण्यात आला आहे. हा जुगाड म्हणजे दोरीचा उपयोग करुन तयार केलेला रोप सस्पेंडर्स स्टाईल जुगाड आहे.

मुख्य म्हणजे हा जुगाड फक्त २५ रुपये किमतीचा आहे. दादर स्थानकाला या दोऱ्या २५ रुपयाला मिळतात असे या पोस्टमध्ये म्हटले आहे. मग तुम्हीही मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमध्ये प्रवास करताना झोप आल्यास हा जुगाड करुन पाहणार का?