Saturday, May 4, 2024
Homeक्रीडाफायनल प्रवेशासाठी ‘रॉयल’ दंगल

फायनल प्रवेशासाठी ‘रॉयल’ दंगल

आज क्वालिफायर-२ साम‌न्यात दोन्ही रॉयल्समध्ये होणार घमासान

अहमदाबाद (प्रतिनिधी) : शुक्रवारी क्वालिफायर २ मध्ये बंगळूरुची लढत राजस्थान रॉयल्सशी होणार आहे आणि या सामन्यातील विजेत्याची लढत रविवारी अंतिम फेरीत गुजरात टायटन्सशी होईल. विजेता संघ अंतिम फेरीत, तर पराभूत संघ घरचा रस्ता धरेल. दोन्ही संघ या लढतीत फायनल प्रवेशासाठीच्या या ‘रॉयल’ दंगलीत विजयी होण्यासाठीच उतरतील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला नशिबाच्या जोरावर प्लेऑफचे तिकीट मिळाले. पण या संघाने क्वालिफायर-२चा सामना जिंकून अहमदाबादचे तिकीट स्वतःहून मिळवले आहे. क्वालिफायर-२ मध्ये आता बंगळूरुची लढत शुक्रवारी राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. पिंक आर्मीबद्दल सांगायचे, तर स्पर्धेच्या गट टप्प्यात त्यांनी बंगळूरुपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीचे तिकीट जिंकण्याचे आव्हान बंगळूरुसाठी सोपे असू शकत नाही. त्याचवेळी, पहिला क्वालिफायर हरल्यानंतर पुढे येत असलेल्या राजस्थानसाठी अंतिम फेरी गाठण्याचा मार्ग तितकासा सोपा असणार नाही.

या मोसमात बंगळूरु केवळ मुंबई इंडियन्समुळेच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. पण क्वालिफायर-२ मध्ये त्यांनी स्वत:च्या दमदार कामगिरीच्या जोरावर मजल मारली आहे. जर राजस्थानला हरवून फायनल जिंकायची असेल, तर कर्णधार फाफ डू प्लेसिस ते विराट आणि मॅक्सवेलसारख्या खेळाडूंना आपले १०० टक्के योगदान द्यावे लागेल. सध्या बंगळूरुची गोलंदाजी चांगलीच मजबूत आहे. पण ऑरेंज कॅप होल्डर असलेल्या बटलरसारख्या फलंदाजांना रोखणे त्यांना फार कठीण जाईल.

दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचे तर, हा संघ देखील अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आतुर असेल. लीग टप्प्यातील सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या आरआरसाठी ही शेवटची संधी असेल. कारण क्वालिफायर-१ मध्ये मिळालेल्या संधीचा फायदा पिंक आर्मीला करता आला नाही आणि संघाला पराभवाचा फटका बसला. गुजरात टायटन्सविरुद्ध विजय मिळवून राजस्थानला थेट अंतिम फेरीत जाण्याची संधी होती. पण हे शक्य झाले नाही. मात्र शुक्रवारी संघाला मिळालेली ही दुसरी संधी आहे.

राजस्थान रॉयल्सला खरोखरच अंतिम फेरीचे तिकीट हवे असेल, तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. कर्णधार संजू सॅमसनला फलंदाजीत महत्त्वाचे योगदान द्यावे लागणार असून उर्वरित फलंदाजांनाही आपले सर्वोत्तम द्यावे लागेल. गेल्या सामन्यात संघाच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची गोलंदाजी. त्यामुळे राजस्थानला नवीन रणनीती आणि तयारीसह बंगळूरुविरुद्ध उतरून त्यांचे विजयाचे उद्दिष्ट सार्थ करावे लागेल.

२००८ मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चुरशीची स्पर्धा सुरू आहे. पण साखळी सामन्यांव्यतिरिक्त एलिमिनेटर सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. दोन्ही संघांचा खेळ खेळण्याची वृत्ती आणि शैली पूर्णपणे वेगळी आहे. राजस्थानमध्ये, जिथे तरुण खेळाडू दर वर्षी आपले कौशल्य दाखवतात, तिथे बंगळूरुमध्ये सुरुवातीपासूनच स्टार खेळाडूंचा मेळा आहे. त्यामुळे ही लढत अधिकच रोमांचक होण्याची शक्यता आहे.

आयपीएलमध्ये या दोन संघांमध्ये आतापर्यंत २७ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी १३ सामने बंगळूरुने, तर राजस्थानने ११ सामने जिंकले आहेत. यादरम्यान ३ सामने अनिर्णित राहिले. दोन्ही संघांमधील विजयाचे अंतर खूपच कमी असून, यंदाची एकंदर कामगिरी बघता या मोसमात पिंक आर्मीचे पारडे जड दिसत आहे. गेल्या ७ वर्षांत पहिल्यांदाच बंगळूरु क्वालिफायर-२ खेळणार आहे. अशा स्थितीत अंतिम तिकीट जिंकण्याचे आव्हान रॉयलसाठी सोपे जाणार नाही. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीनंतरच दुसरा संघ अंतिम फेरीसाठी उपलब्ध होईल.

ठिकाण : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद वेळ : रात्री ७.३० वाजता

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -