Sunday, May 5, 2024
Homeदेशमजबूत अर्थव्यवस्थेसोबत पर्यावरणाचे संरक्षण : नितीन गडकरी

मजबूत अर्थव्यवस्थेसोबत पर्यावरणाचे संरक्षण : नितीन गडकरी

नवी दिल्ली (हिं.स) : परिसंस्था, पर्यावरण आणि विकास यांच्यात समतोल राखण्यावर भर द्यायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

‘इंडस्ट्रियल डिकार्बोनायझेशन समिट २०२२’(IDS-२०२२)-२०७० पर्यंत कार्बन न्यूट्रॅलिटीसाठी आराखडा संबंधी परिषदेचे उदघाटन करताना ते म्हणाले की, विजेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पर्यायी इंधन विकसित करणे आवश्यक आहे. या मुद्द्यांवर विकेंद्रित एकतर्फी दृष्टिकोन देशासाठी लाभदायक नाही, असे गडकरी यावेळी म्हणाले.

आगामी काळात आपल्याला आपली अर्थव्यवस्था मजबूत करायची आहे आणि त्याचबरोबर पर्यावरणाचेही संरक्षण करायचे आहे, असे गडकरी म्हणाले. गडकरी यांनी नमूद केले की, ग्रीन हायड्रोजनला आमचे प्राधान्य आहे, जैवतंत्रज्ञानाचा वापर करून आपण बायोमासची उत्पादकता वाढवू शकतो आणि बायोमास वापरून आपण बायो-इथेनॉल, बायो-एलएनजी आणि बायो-सीएनजी निर्माण करू शकतो. मिथेनॉल आणि इथेनॉलच्या वापराने प्रदूषण कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले.

गडकरी म्हणाले, की एक केंद्रित आराखडा तयार केला पाहिजे आणि पुरेसे संशोधन केले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपली आयात कमी करून निर्यात वाढवता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -