प्रकट दिन रहस्य

Share

अहमदनगरचे नाना जोशी (रेखी) हे त्यावेळचे सुप्रिसद्ध पिंगला ज्योतिषी होते. त्यांनी श्री स्वामी समर्थांची कुंडली बनविली होती. त्या कुंडलीस श्री स्वामींनी संमतीही दिली होती. नाना जोशी काही कामानिमित्त मुंबईस आले होते. या अगोदर त्यांची व श्री स्वामीसुतांची अजिबात ओळखही नव्हती; परंतु नानांनी श्री स्वामीसुमतांचे दर्शन घेताच त्यांनी नाना जोशी नगरकर ते तुम्हीच काय? असे विचारून स्वतःच्या अंतर्ज्ञानाची चुणूक नानांस दाखविली.

नानांसही श्री स्वामीसुतांच्या दिव्यत्वाची प्रचिती आली. त्यामुळे नानांनी सद्गदित अंतःकरणाने स्वामीसुतांच्या पायावर डोके ठेवले. याच नानांनी पुढे स्वामीसुतांचा अनुग्रह घेतला. त्यांच्या सूचनेवरूनच नानांनी स्वामी समर्थांची कुंडली बनविली होती. पुढे शके १७१३ (इ.स. १८७१) चैत्रमासात स्वामीसुत अक्कलकोटला आले. त्यांनी संपूर्ण अक्कलकोट गावात स्वामी समर्थ प्रकटीकरणाचा उत्सव मोठ्या उत्साहाने केला.

या चैत्र शुद्ध द्वितीयेच्या दिवशी त्यांनी डोक्यावर भगर, खजुराची टोपली घेऊन तो फराळ प्रसाद म्हणून घरोघरी वाटला. त्यांच्या या कृतीची काही रिकामटेकडे, भोजनभाऊ सेवेकरी टिंगल-टवाळी-थट्टा करू लागले. स्वामीसुतांस वेडा समजून हसत होते. पण, त्या अज्ञजनांस काय माहिती की स्वामीसुतांस श्री स्वामी समर्थ भक्तीचे वेड लागले आहे म्हणून. पण स्वामींस, स्वामीसुतांची ती कृती पूर्ण ज्ञात होती. स्वामीसुत काय करीत आहेत? असे जेव्हा शिवूबाई, भुजंगा यांनी स्वामींस विचारले त्यावर हा आमच्या लग्नाचा उत्सव साजरा करीत आहे. असे उत्तर त्यांनी त्यांना दिले. लग्नाचा उत्सव हा आनंददायी असतो, यातून महाराजांनी स्वामीसुत जे काम करीत होते त्यास अनुकूलताच दाखवून एक प्रकारे पसंतीच दिली. शिवाय त्याप्रसंगी स्वामीसुत जे-जे अभंग म्हणत त्यानुसार गोट्या खेळणे व अन्य लीला ते करीत होते. त्यामुळे चैत्र शुद्ध द्वितीया हा श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणून आजही साजरा केला जातो तो स्वामीसुतांच्या या आगळ्या- वेगळ्या कृतीने.

-विलास खानोलकर

Recent Posts

50MP सेल्फी कॅमेरा, Curved AMOLED डिस्प्लेसोबत लाँच झाला Vivo V30e 5G, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

मुंबई: व्हिवोने आज अखेर आपला फोन भारतात लाँच केला आहे. विवोने या सीरिजमधील दोन फोन…

14 mins ago

Amit Shah : निकालाच्या दिवशी दुपारी साडेबाराच्या आधी ४०० पारचं लक्ष्य पार करणार!

भाजपा आणि एनडीए पूर्णपणे ट्रॅकवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा नवी दिल्ली : लोकसभा…

32 mins ago

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध पक्षांच्या चार उमेदवारांनी तर दोन अपक्ष उमेदवारांनी आपले…

49 mins ago

Delhi Commission for Women : दिल्ली महिला आयोगाच्या २२३ महिला कर्मचाऱ्यांचं निलंबन!

आयोगाच्या माजी अध्यक्षांवर गंभीर आरोप करत राज्यपालांनी दिले निलंबनाचे आदेश नवी दिल्ली : दिल्लीच्या महिला…

2 hours ago

“लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका आणंद (गुजरात) : आपण 'लव जिहाद', 'भू जिहाद' याबाबत…

3 hours ago

Chitra Wagh : ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?

ठाकरे गटाच्या जहिरातीवरुन चित्रा वाघ यांचा परखड सवाल मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections)…

4 hours ago