Chitra Wagh : ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?

Share

ठाकरे गटाच्या जहिरातीवरुन चित्रा वाघ यांचा परखड सवाल

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) रणधुमाळीत सध्या जाहिरातींचा (Advertisements) पूर आला आहे. अनेक सरकारी जाहिराती तसेच विरोधी पक्षांच्याही जाहिराती सर्वच माध्यमांवर दिसत आहेत. या जाहिरातींतून सरकारने आपल्या कामांचे प्रदर्शन केले आहे तर विरोधकांनी सरकारच्या अपयशावर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यातील एक जाहिरात ठाकरे गटाला (Thackeray Group) चांगलीच महागात पडणार आहे. या जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतला असून ‘ठाकरे गटाला या जाहिरातीतून पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?’ असा परखड सवाल भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उपस्थित केला आहे.

आज मुंबईत चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्या म्हणाल्या, ठाकरे गटाने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात तो महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला.

पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का?

या पत्रकार परिषेदत चित्रा वाघ यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, या जाहिरातीमधील कलाकारामुळे महाराष्ट्रातील महिलांची मान शरमेने झुकली आहे. ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टारचा समावेश आहे. आदूबाळने याआधीच नाईट लाईफसाठी आग्रह धरला होता. आता, त्यांना पॉप, पार्टी आणि पॉर्नची संस्कृती रुजवायची आहे का? एक पॉर्न स्टार उबाठाच्या जाहिरातीमध्ये झळकतो. त्यांना जाहिरातीसाठी इतर कलाकार मिळाला नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला. जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे यांचा काही संबंध आहे का? याचाही तपास करायला हवा असे चित्रा वाघ यांनी म्हटले.

Recent Posts

LS Election : शिवतिर्थावर आज ‘मोदी-राज’ अवतरणार!

मुंबई : मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार (LS Election) करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी,…

3 hours ago

Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दि १७ मे २०२४.

पंचांग आज मिती वैशाख शुद्ध नवमी ८.४८ पर्यंत नंतर दशमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा…

3 hours ago

मोदींच्या रोड शोमुळे मतदारांचा उत्साह शिगेला

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेकाॅर्डब्रेक गर्दीच्या सभा होताना दिसतात; परंतु पंतप्रधान मोदी यांना जवळून…

6 hours ago

अवयवदान प्रबोधनाची चळवळ

कुमार कदम शरीरातील केवळ कोणता तरी महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यामुळे मृत्यूशी निकराची झुंज देत असलेली…

6 hours ago

आरोग्य विम्यासाठी वयाची अट काढली, पण…

अभय दातार, मुंबई ग्राहक पंचायत मागच्या महिन्यात एक महत्त्वाची बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, ती म्हणजे…

7 hours ago

पहिल्या चार टप्प्यातच झालाय महाविकास आघाडीचा सुपडा साफ

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला दावा मुंबई : महाराष्ट्रात चार चरणांच्या निवडणूक पूर्ण झाल्या आहेत. २०…

10 hours ago