Saturday, May 18, 2024
Homeमहत्वाची बातमीRailway Travel : लोकलवर दगडफेकीचे प्रकार ‘वाढतावाढे’

Railway Travel : लोकलवर दगडफेकीचे प्रकार ‘वाढतावाढे’

२०२१ पासून आतापर्यंत २४ घटना

मुंबई (प्रतिनिधी) : धावत्या लोकलवर दगडफेकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. (Railway Travel) मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर २०२१ पासून आतापर्यंत लोकलवर दगडफेकीच्या २४ घटना घडल्या आहेत. यात नऊ आरोपींना अटक झाली आहे. २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

सोमवारी धावत्या एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या प्रकारात एक महिला प्रवासी जखमी झाली. या विकृत घटनेने लोकल प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान गेल्या दोन वर्षांतील लोकलवरील दगडफेकीच्या घटनांचा आढावा घेतल्यास या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

२०२१ मध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई हद्दीत दगडफेकीच्या नऊ घटना घडल्या आहेत. त्यातील मध्य रेल्वेवर आठ, तर पश्चिम रेल्वेवर एक घटना घडली आहे. २०२२ मध्ये एकूण १५ गुन्हे दाखल झाले असून यापैकी १० गुन्हे मध्य रेल्वेवरील आहेत. २०२२ मध्ये एकूण घडलेल्या गुन्ह्यांमध्ये पाच गुन्हे समोर आले असून यात सात आरोपींना अटक केली आहे. वांद्रे, नेरळ, अंबरनाथ, माहीम, उल्हासनगर या ठिकाणी हे विकृत प्रकार घडले आहेत. मुंबईतील रेल्वे मार्गाला लागून मोठ्या प्रमाणात झोपड्या आहेत. अनेकदा या झोपड्यांमुळे रेल्वेच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -