Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीRahul Narvekar : आमदार अपात्रतेबाबत आज सादर होणार का सुधारित वेळापत्रक?

Rahul Narvekar : आमदार अपात्रतेबाबत आज सादर होणार का सुधारित वेळापत्रक?

दोनदा ताकीद दिल्यानंतर आजचा दिवस महत्वाचा

मुंबई : राज्यात राजकारणात ठाकरे विरुद्ध शिंदे (Thackeray Vs Shinde) असा संघर्ष गेल्या दीड वर्षापासून सुरु आहे. त्यात पवार काका पुतण्याच्या संघर्षाचीही भर पडली आहे. ठाकरे गटाने शिवसेना आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाने राष्ट्रवादीच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाविरोधात आमदार अपात्रतेप्रकरणी (MLA Disqualification) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत. मात्र, या याचिकांवर सुनावणी करण्यास विलंब होत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

आमदार आपात्रतेचा निर्णय घेण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने पूर्णतः राहुल नार्वेकरांवर सोपवलं असल्याने त्यांनी या सुनावणीसाठी वेळापत्रक तयार केलं होतं. मात्र, वेळापत्रक वेळखाऊ असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने दोनदा ते फेटाळलं होतं. यानंतर नार्वेकरांना ३० ऑक्टोबर ही सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आली होती. त्यानुसार आज नार्वेकर बदल केलेलं वेळापत्रक सादर करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मागच्या सुनावणीवेळी अध्यक्षांनी वेळापत्रक दिले नाही तर, आम्हीच वेळापत्रक देऊ आणि त्या वेळापत्रकाचे पालन करावे लागेल, असे सरन्यायाधीशांनी बजावले होते. त्यानंतर राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रतेच्या ३४ याचिकांना ७ याचिकांमध्ये एकत्र करून कामाला सुरुवात केली होती. याबाबतचा तपशील आजच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाला दिला जाण्याची शक्यता आहे.

आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेऊन चर्चा केली. सुमारे पाऊण तास ही चर्चा चालल्याची माहिती मिळाली आहे. ‘‘मेहता यांच्याकडून जो कायदेशीर सल्ला घ्यायचा आहे, तो घेतला आहे. न्यायालयात आम्ही योग्य ती भूमिका मांडू’’, असे नार्वेकर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमकं काय घडणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -