राष्ट्रपती मुर्मूंचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी : मुख्यमंत्री शिंदे

Share

मुंबई : अतिशय विपरीत परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या द्रौपदी मुर्मू या आमच्या सगळ्यांसमोर एक आदर्श आहेत. त्यांचा जीवनसंघर्ष आणि संकटांवर मात करण्याची त्यांची इच्छाशक्ती आज अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत काढले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसेच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे अभिनंदन करणारा प्रस्ताव मांडला. त्यावेळी ते बोलत होते.

मुर्मू यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी जाहीर झाल्यावर त्या मुंबईला आल्या होत्या तेव्हा मी त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटलो. नंतर त्यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्याची संधीही मिळाली. एखादी व्यक्ती इतकी डाऊन टू अर्थ असावी, याचे खूप आश्चर्य वाटले. त्या राष्ट्रपती होणार होत्या. पण कमालीची विनम्रता आणि आपण ज्या समाजातून आलो आहोत, त्यांचे देणे असल्याची भावना त्यांच्यात असलेली पाहून मी भारावून गेलो, असे ते म्हणाले.

भारताचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सन १९८९ साली राजकारणात प्रवेश केला. ते १९८९ मध्ये राजस्थानातील झुनझुनु मतदारसंघातून लोकसभेवर निर्वाचित झाले होते. एप्रिल १९९० ते नोव्हेंबर १९९० या कालावधीत त्यांनी केंद्रीय संसदीय कामकाज खात्याचे राज्यमंत्री म्हणून उत्तम कार्य केले. त्यांनी १९९३ ते १९९८ या कालावधीत राजस्थानातील किसनगंज विधानसभा मतदारसंघाचेही प्रतिनिधीत्व केले होते. धनखड जुलै २०१९ पासून पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. अशा या संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव असलेल्या संसदपटूची भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो, अशा शब्दांत शिंदे यांनी धनखड यांना शुभेच्छा दिल्या.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या, सर्वोच्च स्थानी, राष्ट्रपतीपदी, द्रौपदी मुर्मू यांच्यासारखी भगिनी निवडून आली आहे. उपराष्ट्रपतीपदी जगदीप धनखड यांची निवड झाली आहे. या दोन महान व्यक्तिमत्वांची झालेली निवड ही, आपल्या देशात रुजलेल्या परिपक्व लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे. भारतीय जनमानसात लोकशाही किती खोलवर रुजली आहे, हे दाखवणारी ही घटना आहे, असे त्यांना सांगितले.

धनखड क्रीडाप्रेमी आहेत. कधीकाळी त्यांनी राजस्थान ऑलिंपिक संघटना आणि राजस्थान टेनिस संघटनेचे अध्यक्षपद सांभाळले आहे. धनखड यांचे राजकारण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात एकावेळी वावरणे ही गोष्ट माझ्यासारख्याला निश्चितच आवडणारी, भावणारी आहे, असेही अजित पवार म्हणाले.

उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनीही यावेळी भाषण केले. एक तीर, एक कमान, सर्व आदिवासी एकसमान, असा नारा त्यांनी यानिमित्ताने दिला. त्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी हा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले.

विधानसभा तालिका अध्यक्षांची नावे जाहीर

अधिवेशन कालावधीतील तालिका अध्यक्षपदी सदस्य संजय शिरसाट, कालिदास कोळंबकर, मनोहर चंद्रिकापुरे, शिरीष चौधरी यांची नावे नामनिर्देशित करण्यात आल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली.

२५ हजार ८२६ कोटींच्या पुरवण्या मागण्या सादर

अभिनंदनाच्या प्रस्तावावरील भाषणे सुरू असतानाच फडणवीस यांनी सभागृहात २५ हजार ८२६ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. २२ आणि २३ तारखेला त्यावर चर्चा व मतदान होईल, असे अध्यक्षांनी स्पष्ट केले.

विविध विधेयके मांडली

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या सुधारणा, महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा, मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका सुधारणा, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा, महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा ही विधेयके यावेळी मांडण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागरचनेत तसेच प्रभागसंख्येत बदल करणाऱ्या तसेच सरपंचांची व नगराध्यक्षांची थेट निवड करणाऱ्या सुधारणांचा यात समावेश आहे.

विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली

विधानसभेत सहा माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडला. भरत बहेकर, बाबुराव पाचर्णे, जनार्दन बोंद्रे, नानासाहेब माने, रावसाहेब हाडोळे, उद्धवराव शिंगाडे यांचा यात समावेश होता.

Recent Posts

महाभारतातील ज्ञानकर्ण

विशेष: भालचंद्र ठोंबरे अर्जुन युधिष्ठिरचा वध करण्यास निघतो, तेव्हाचा कौरव पांडवांमधील महाभारताच्या युद्धाचा १७वा दिवस.…

3 hours ago

अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचे ‘पंचम’ करणार गावांना सक्षम…

फिरता फिरता: मेघना साने अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन ही संस्था दरवर्षी महाराष्ट्रातील काही सामाजिक संस्थांना निधी…

3 hours ago

‘या’ मानसिकतेचे करायचे काय?

प्रासंगिक:अरविंद श्रीधर जोशी अगदी परवाचीच गोष्ट, एका बैठकीसाठी भाईंदरला गेलो होतो. ठाण्याला परत यायला निघालो.…

3 hours ago

सोशल मीडिया, प्री टीन्स आणि टीनएजर्स

आनंदी पालकत्व: डाॅ. स्वाती गानू हे तर निर्विवाद सत्य आहे की, प्री-टीन्स असो की टीनएजर्स…

3 hours ago

‘दिल ऐसा किसीने मेरा तोडा…’

नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे प्रसिद्ध बंगाली साहित्यिक शक्तीपद राजगुरू यांच्या ‘नया बसत’ या कादंबरीवर आधारित ‘अमानुष’(१९७५)…

3 hours ago

मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवी

कोकणी बाणा: सतीश पाटणकर मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे. मुंबईचे नाव मुंबादेवी या देवीवरून पडले…

3 hours ago