सोशल मीडिया, प्री टीन्स आणि टीनएजर्स

Share

आनंदी पालकत्व: डाॅ. स्वाती गानू

हे तर निर्विवाद सत्य आहे की, प्री-टीन्स असो की टीनएजर्स मुलांच्या ॲटिट्यूड आणि वागण्यावर सोशल मीडियाचा खूप मोठा परिणाम होतो. जर स्वतः मुलं सोशल मीडियाच्या परिणामांबद्दल सावध असतील, तर ते हे प्रेशर मुलं नीट सांभाळू शकतात. पण खरंच सध्याच्या काळात सोशल मीडियाचा मुलांवर होणारा परिणाम चिंता वाढवणारा आहे. म्हणूनच याबाबत मुलांशी बोलणं, त्यांना प्रश्न विचारायला शिकवणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. काही ठळक गोष्टी पालक म्हणून आपण लक्षात घ्यायला हव्या.

१) मुलं ही मीडियाद्वारे पाठवलेला मेसेज समजणारे स्मार्ट कन्झ्युमर असतात.

२) मीडियातून ब्रॅण्ड्स, फोटो, जाहिरातींमधून मुलांवर जाणीवपूर्वक प्रभाव टाकला जातो.

३) काही वेळेस इनडायरेक्ट इनफ्लुएन्सही मुलांवर पडत असतो.

४) इन्स्टा, स्नॅप चॅट, टिकटॉक, यूट्युब या सोशल मीडियावर येणाऱ्या ॲडल्ट, व्हायोलंट इमेजेस, यातील अभद्र भाषा, व्हीडिओ गेम्स, काही अश्लील शब्द असणारी गाणी या प्रकारच्या मीडियामधून जणू मुलांना असं वाटतं की, याच पद्धतीने जीवनाकडे बघायचं असतं, जगायचं असतं. त्यांचा दृष्टिकोन असाच तयार होत जातो.

सोशल मीडियाचा परिणाम जसा नकारात्मक असतो, तसा सकारात्मकदेखील असतो. दोन्ही बाजू जाणून घेऊ या…

प्री-टीन्स, टीनएजर मुलांवर सोशल मीडियाचा सकारात्मक परिणाम कसा होतो?
१) जर मुलांनी टी. व्ही.वरील न्यूज चॅनेलवर बातम्या ऐकल्या, पाहिल्या तर मोठे सामाजिक, राजकीय बदल मुलांच्या मनावर बिंबविले जाऊ शकतात. मीडियातून मुलांना समाजातील महत्त्वाच्या गोष्टींबाबत जागरूक होण्यासाठी प्रोत्साहन देता येतं.

२) हेल्थ आणि लाईफ स्टाईलबाबतीत मीडियातून मुलांना चांगल्या टिप्स मिळू शकतात. यातून हेल्थ प्रमोशन मेसेजेस दिले जातात. आपलं शरीर मजबूत होण्यासाठी, योग्य वाढीसाठी, मानसिक आरोग्यासाठी काय आवश्यक आहे हे मुलांना कळतं. काही टॉक शोमधून यंग जनरेशनला डिप्रेशन, सुइसायडल टेन्डन्सी यांबद्दल सजग केलं जाऊ शकतं.

३) मीडियाचा आणखी एक पॉझिटिव्ह परिणाम म्हणजे मुलांना सोशल मीडियावरच्या गुड टी.व्ही. स्टोरीजमधून आयडेंटिटी सापडते की, आपण कोण आहोत? आपल्यातील क्वालिटीज कशा एक्सप्लोअर करायच्या, दोष कसे कमी करायचे हे कळतं.

याउलट सोशल मीडियाचा निगेटिव्ह इनफ्लुएन्स प्री टीन्स आणि टीनएजरवर काय प्रभाव टाकतो, तर सेल्फ इमेज, बॉडी इमेज, हेल्थ अँड नॅशनलिटी याबद्दलच्या चुकीच्या कल्पना तयार होतात. जसं की ‘thin is beautiful.’

हेल्थ आणि लाईफ स्टाईलबाबतीतही मुलांवर निगेटिव्ह परिणाम होतो. मुलं सोशल मीडियावर पाहून जंक फूड खाण्याचा, ब्रँडेड कपडे, शूज, ज्वेलरी, ॲक्सेसरीचा हट्ट करतात, अनुकरण करतात. अगदी अल्कोहोल, कोल्ड्रिंक, सिगारेट यांच्या जाहिरातीतून या गोष्टींचं उदात्तीकरण केलं जातं, त्यामुळे त्याचा नकारात्मक परिणाम मुलांवर होत असतो. कारण ही हेल्दी लाईफ स्टाईल आहे, असं त्यांना वाटू शकतं. मुलांना फेक न्यूजमधून चुकीची माहिती मिळत असते, हेही धोकादायक आहे. मीडियामधील सेलिब्रिटी, इनफ्लुएन्सर्स यांची इनफ्लुएन्स पॉवर तर इतकी जबरदस्त असते की, त्यांनी एन्डॉर्स केलेली प्रॉडक्ट्स, त्यांची लाईफ स्टाईल, त्यांचे मॅनरिझम्स मुलांना खूप आकर्षित करतात.

मुलांना हे लक्षातच येत नाही की, हे लोक त्यांचं किंवा प्रॉडक्ट्सचं प्रमोशन करत असतात आणि मुख्य म्हणजे या प्रॉडक्ट्सचं प्रमोशन करायला त्यांना पैसे मिळत असतात. हे मुलांना नीटसं कळत नाही किंवा तो विचार ते करतच नाहीत. मग आता मुलांना हा सोशल मीडिया, इतर मीडिया कसे वापरायचे हे शिकवायलाच हवं.

१) जाहिरातीत दाखविलेले प्रॉडक्ट्स घरी आणून वापरताना त्यातील इनग्रेडियन्टस काय काय आहेत, आर्टिफिशियल फ्लेवर्स इ. आहेत का? त्याची एक्स्पायरी डेट यासारख्या गोष्टी बघण्याची, समजावून घेण्याची दृष्टी देणं आवश्यक आहे.

२) मुलांना मीडिया व त्यात दिसणाऱ्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायला प्रोत्साहन द्यायला हवे. यातून मुलं मतं तयार करण्यापूर्वी तथ्य (facts) शोधायला शिकतील. ॲडव्हरटाईज, फेक न्यूज ओळखू शकतील. मीडियातील बायस दृष्टिकोन, स्टॅटिस्टिकल डाटाचा मिसयुज करून लोकांना कसं भुलवलं जातं त्याचा विचार करतील. जर तुमची मुलं युट्यूब चॅनेल्स, इन्स्टाग्राम अकाऊंट वापरत असतील, तर सहज गप्पा मारताना ही चर्चा करा. त्या चर्चेत हे प्रश्न येऊ देत, जे मुलांना स्वतःला पडायला हवेत. उदाहरणार्थ,
१) हे यूट्युब चॅनेल, इन्स्टाग्राम चालवणारे लोक कोण असतात?

२) त्यांनी हे करण्यामागचे त्यांचे मोटिव्हेशन काय असेल?

३) त्यांना तुमच्याकडून काय हवं असेल?

४) सोशल मीडिया वापरताना तुम्ही काय फील करता?

५) तुम्हाला तसा फील यावा म्हणून त्या लोकांनी जाणीवपूर्वक ते तसं तयार केलंय का? आणि का केलं असेल तसं?

६) मला सेलेब्रिटीज आणि इनफ्लुएन्सर्स का आवडतात?

७) ते जे या मीडियातून प्रेझेंट करतात ते रिअल पद्धतीने करतात का?

८) ही माणसं कोणती मूल्ये (values) सांगू इच्छितात?

९)माझ्याबद्दल कोणत्या भावना ही माणसं माझ्यात निर्माण करतात?

१०) ही माणसं मला या प्रॉडक्ट्स किंवा ॲक्टिव्हिटीजबद्दल का सांगत आहेत?

११) या माणसात इनफ्लुएन्सरची चिन्हं जाणवत आहेत का?

१२) ही ॲडव्हरटाईज जे प्रॉडक्ट दाखवतेय ती माझी लाईफ स्टाईल तर ठरवत नाहीय ना? मी काय करावं, काय खावं प्यावं, कोणते कपडे घालावे, स्वतःचे मनोरंजन कसे करावे हे तर सोशल मीडिया, अदर मीडिया ठरवत तर नाहीय ना?

१३) ऑनलाइन फोरमवरून बोलणारी मंडळी जात, धर्म, देश, संस्कृतीबद्दल बायस होऊन तिरस्कार तर निर्माण करत नाहीत ना? माझं डोकं ते तर चालवत
नाहीत ना?

१४) हा ऑनलाइन फोरम पाहून, ऐकून मी स्वतःला सुरक्षित, आनंदी फील करतोय की मला अस्वस्थ वाटतंय?

या प्रश्नांवर घरात मुलांसमोर, मुलांशी नक्कीच संवाद करा. त्यांनाही मतं मांडू देत. ती ऐकून घ्या. मुख्य म्हणजे सोशल मीडिया, अदर मीडियाबरोबरच फिजिकल क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी या दोघांचा तोल मुलांना सांभाळायला लावा. समाजातील कार्यक्रम, व्यक्ती यात समोरासमोर सहभागी व्हायची संधी द्या. त्यांच्यासमोर रिअल लाईफमधील पॉझिटिव्ह रोल मॉडेल येऊ देत. मुलांना स्पोर्ट्स क्लब, मेन्टॉरिंग प्रोग्रॅमस, हायकिंग, ट्रेकिंग याही गोष्टीत सहभागी होण्याचा आग्रह कराच. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा डोळस वापर करायला आपणच मुलांना शिकवायला हवं.

Recent Posts

Sanjay Raut : पंतप्रधान मोदींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल!

ऐन निवडणुकीच्या काळात राऊतांना 'ते' वक्तव्य चांगलंच भोवणार मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत…

2 hours ago

Accident news : चारधामसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सने पेट घेतला अन्…

बुलढाणा बस दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता वाचली! बुलढाणा : गतवर्षी जून महिन्यात बुलढाणा येथे एक…

2 hours ago

Mihir kotecha : लोकसभेच्या गेटबाहेर गुटखा विकणारा खासदार पाठवायचाय की तुमचा सेवक पाठवायचाय?

कालच्या राड्याप्रकरणी मिहिर कोटेचा यांचा मुंबईकरांना सवाल मविआच्या २५-३० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल; ५ जण पोलिसांच्या…

3 hours ago

Kolhapur news : मुलाला वाचवताना तिघांचा नदीत बुडून मृत्यू! कोल्हापुरात घडली भीषण दुर्घटना

हसन मुश्रीफांनी घटनेची दखल घेत तातडीने आर्थिक मदत करण्याच्या दिल्या सूचना कोल्हापूर : कोल्हापुरातून (Kolhapur)…

4 hours ago

Gurucharan Singh : गेल्या २५ दिवसांपासून बेपत्ता गुरुचरण सिंग अखेर घरी परतले!

कारण सांगताच घरचेही अवाक नवी दिल्ली : 'तारक मेहता का अलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून…

5 hours ago

Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी…

6 hours ago