Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : भारतात काँग्रेस असताना 'मनी हाईस्ट'ची गरज काय?

PM Narendra Modi : भारतात काँग्रेस असताना ‘मनी हाईस्ट’ची गरज काय?

धीरज साहू प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला टोला

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) सध्या एका वेगळ्याच प्रकरणामुळे चर्चेत आलं आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू (Dhiraj Sahu) यांच्या घर आणि कंपनीत रग्गड काळा पैसा आढळून आला आहे. आयकर विभागाने (IT Department) केलेल्या छापेमारीत (Raid) ३५३ कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे. ही रक्कम मोजण्याकरता मागवण्यात आलेल्या मशीन्सदेखील नोटा मोजता मोजता बंद पडल्या तरीही नोटांची मोजणी पूर्ण झालेली नाही. या प्रकरणामुळे काँग्रेसचा संपूर्ण भ्रष्टाचार आता समोर आला आहे. यात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) देखील काँग्रेसवर उपहासात्मक टीका केली आहे.

पंतप्रधानांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन (X Account) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी भाजपाच्या अधिकृत अकाऊंटवरुन शेअर केलेला एक व्हिडीओ रिपोस्ट केला आहे. धीरज साहूंच्या घरी आढळून आलेला काळा पैसा व्हिडीओमध्ये दिसत आहे. कॅप्शनमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, ‘भारतात काँग्रेस असताना मनी हाईस्ट (Money Heist) सारख्या काल्पनिक गोष्टीची गरजच काय? त्यांचा भ्रष्टाचार ७० वर्षांपासून चालत आला आहे आणि अजूनही सुरुच आहे’, असा टोला मोदींनी लगावला आहे.

सहा दिवसांपूर्वी झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील धीरज साहूंच्या ९ ठिकाणांवर छापे टाकून त्यांची झडती घेण्यात आली होती. तर बलांगीर आणि तितलागड येथील दारूच्या भट्ट्यांमधून देखील मोठी रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागाची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. आता यावर ईडीची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -