Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीतुर्भे विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई

तुर्भे विभागात प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाई

तुर्भे: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र एकल प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्यात येत असून त्यादृष्टीने प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा राबविण्यात येत आहेत.

आज ६ मार्चला तुर्भे विभाग कार्यलयामार्फत विभाग अधिकारी श्री. भरत धांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व स्वच्छता अधिकारी श्री राजूसिंग चव्हाण यांच्या सूचनेनुसार विभागात ठिकठिकाणी प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर करणा-या व सार्वजनिक ठिकाणी केरकचरा टाकून उपद्रव करणा-या व्यावसायिकांवर, नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, संतोष देवरस, विष्णू रावते, हनुमान मेश्राम, योगेश पाटील, विजय दुर्लेकर यांच्या पथकाने दंडात्मक शुल्क रक्कम रू. ६७५०/- वसूल केली व त्यासोबत ६ किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जमा केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -