Friday, May 17, 2024
Homeमहामुंबईमालमत्ता कर ऑनलाइन भरा; पालिकेचे आवाहन

मालमत्ता कर ऑनलाइन भरा; पालिकेचे आवाहन

मुंबई (प्रतिनिधी) : मालमत्ता कर भरण्यासाठी ऑनलाईन सेवेचा वापर करण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. पालिकेच्या वतीने आर्थिक वर्ष २०२२-२०२३ ची मालमत्ता कर देयके भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

सन २०२२-२३ साठी वार्षिक सर्वसाधारण देयके करदात्यांना ईमेलद्वारे पाठवली जात आहेत. शिवाय लघुसंदेश (एसएमएस) आणि व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारेही संदेश पाठवले जात आहेत. करदात्यांनी अधिदानासाठी ऑनलाईन सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, करदात्यांना भ्रमणध्वनी किंवा ईमेलवर‘ओटीपी’ प्राप्त करताना काही समस्या येत असल्यास, मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर संकेतस्थळावरील सीव्हीएस लॉगइन पृष्ठावर “ओटीपी व्हेरिफीकेशन इंस्ट्रक्शन पीडीएफ” बाबतच्या सूचना https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या लिंकवर कृपया संदर्भित कराव्यात असे सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -