Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीडेंग्युचा प्रकोप! रुग्णसंख्येने प्रशासन हादरले

डेंग्युचा प्रकोप! रुग्णसंख्येने प्रशासन हादरले

नागपूर:  सततच्या मुसळधार पावसामुळे नागपूरात डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. वाढत्या रुग्ण संख्येचा विचार करता नागपूरात डेंग्यू हा चांगलाच चिंतेचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे एकट्या जुलै महिन्यात नागपूरात डेंग्यूचे ८० रुग्ण आढळले आहे. तर चालू वर्षात रुग्णसंख्या १५३ वर पोहचली आहे. फक्त नागरी वस्त्याच नाही तर शासकीय कार्यालय देखील डेंग्यूच्या विळख्यात सापडल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.

डेंग्यूचा वाढता प्रकोप पाहता महानगर पालिकेचे आरोग्य अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्हा परिषदेला भेट दिली. तेथील एकंदरीत परिस्थिती पाहून त्यांना धक्का बसला. अध्यक्ष , उपाध्यक्ष व सभापती यांच्या सर्वांच्या कार्यालयात पथकाला कुलरच्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या सापडल्या. तसेच पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंत्र्याचे बंगले तपासले तर तेथे पण पालिकेच्या पथकाला डेंग्यूच्या अळ्या आढळल्या.

मागच्या काही दिवसापासून नागपूर मध्ये सतत पाणी कोसळत आहे. त्यामुळे साचलेल्या पाण्याने शहरातील उत्तर व पूर्व नागपूर भागात डेंग्यूचा मोठा प्रकोप पाहायला मिळत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नागरिकांच्या जनजागृतीचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. मात्र मागच्या ७ दिवसात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळल्याने नागपूर मध्ये परिस्थिती चिंतेची बनली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -