Monday, May 20, 2024
Homeसाप्ताहिकअर्थविश्वOnline money transfer : फक्त लाभार्थीच्या नाव आणि मोबाईल नंबरद्वारे सहज पाठवता...

Online money transfer : फक्त लाभार्थीच्या नाव आणि मोबाईल नंबरद्वारे सहज पाठवता येतील पाच लाख रुपये

जाणून घ्या काय आहे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया

मुंबई : भारतात सध्या ऑनलाईन पेमेंटचे (Online payment) प्रमाण फार वाढले आहे. छोट्या मोठ्या व्यवहारांसाठी देखील लोक सहज ऑनलाईन पेमेंट प्रणालीचा वापर करतात. पण मोठी रक्कम ट्रान्सफर (Online money transfer) करायची असेल तर सध्याच्या प्रक्रियेनुसार थोडा अधिक वेळ लागतो. मात्र, आता हा वेळ कमी होऊन अगदी झटक्यात पाच लाख इतकी मोठी रक्कमही सहज ट्रान्सफर करता येणार आहे. यासाठी लाभार्थीचा मोबाईल नंबर आणि नाव तुमच्याजवळ असले की काम सोपे होणार आहे. त्यासाठी IMPS म्हणजेच इमीडिएट पेमेंट सर्विसचा वापर करावा लागेल.

IMPS पद्धतीने ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोन बँकिंग (Phone banking) किंवा नेट बँकिंगशी (Net banking) जोडावं लागेल. सध्याच्या नियमांनुसार, IMPS द्वारे मोठी रक्कम पाठवण्यासाठी, लाभार्थीचे नाव, बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेला थोडा जास्त वेळ लागतो. परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी प्रक्रिया करावी लागणार नाही. तुम्ही फक्त बँक खात्यात नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि नावाद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट ट्रान्सफर करू शकता.

यासाठी NPCI ने ३१ ऑक्टोबर रोजी एक परिपत्रक जारी केले होते आणि आता १ फेब्रुवारीपासून IMPS चे नियम देखील बदलणार आहेत. यामुळे तुम्ही लांबलचक प्रक्रियेपासून वाचाल आणि कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पैसे सहज हस्तांतरित करू शकाल.

तुम्ही IMPS द्वारे पैसे कसे पाठवू शकता?

– तुमचे मोबाइल बँकिंग ॲप उघडा.

– मुख्य पृष्ठावर जाऊन ‘फंड ट्रान्सफर’ पर्यायावर क्लिक करा.

– पुढील प्रक्रियेसाठी निधी हस्तांतरणासाठी ‘IMPS’ पद्धत वापरा.

– लाभार्थीचा MMID (मोबाइल मनी आयडेंटिफायर) आणि MPIN (मोबाइल वैयक्तिक ओळख क्रमांक) प्रविष्ट करा.

– ॲपमध्ये तुम्हाला किती पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ते एंटर करा.

– सर्व तपशील तपासल्यानंतर, पुढे जाण्यासाठी पुष्टी करा वर क्लिक करा.

– तुम्हाला एक OTP प्राप्त होईल आणि हा व्यवहार प्रमाणित करण्यासाठी तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा.

– तुमच्या फोनवर OTP येईल आणि तुम्ही तो टाकून तुमचा व्यवहार पूर्ण करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -