One Nation One Election : एक देश एक निवडणूक! सध्या तरी कठीण.. पण का?

Share

निवडणूक आयोगाने मागितला आणखी वेळ!

नवी दिल्ली : ‘एक देश एक निवडणूक’ (One Nation One Election) साठी विधी आयोगाकडून जय्यत तयारी सुरु असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने मात्र यासाठी आणखी वेळ मागितला आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत असल्याने आयोगाने ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सची कमतरता आणि त्यातील चीपचा मुद्दा उपस्थित केला आहे.

२०२४ आणि २०२९ मध्ये एकत्र निवडणुका घेण्यासंबंधी (One Nation One Election) निवडणूक आयोगाने यापूर्वीच ईव्हीएम मशिन्सच्या संख्येवरुन विधी आयोगाला माहिती दिली होती. एका ईव्हीएम मशिनमध्ये तीन भाग असतात. ज्यात कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅट असते. २०२४ साठी ११.४९ लाख अधिकचे कंट्रोल युनिट, १५.९७ बॅलेट्स युनिट आणि १२.३७ लाख व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे. यासाठी ५ हजार २०० कोटी रुपये खर्च होतील.

तसेच मतदान केंद्र आणि मतदारांची वाढती संख्या पहाता २०२९ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाला ५३.७६ लाख बॅलेट युनिट्स, ३८.६७ लाख कंट्रोल युनिट्स आणि ४१.६५ लाख व्हीव्हीपॅटची आवश्यकता भासणार आहे.

मुळात जागतिक स्तरावर चीप आणि सेमीकंडक्टरचा तुटवडा असल्याने निवडणूक आयोग चिंतीत आहे. विधी आयोगासोबत पार पडलेल्या बैठीकमध्ये निवडणूक आयोगाने हा मुद्दा मांडला. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी देखिल निवडणूक आयोगाला जवळपास ४ लाख मशिन्सची गरज पडणार आहे. यात विधानसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या मशिन्सची आकडेमोड केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ईव्हीएम मशिन्सच्या उत्पादनासाठी साधारण एक वर्षांचा वेळ लागू शकतो. कोरोना महामारीमुळे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाला आहे. यापूर्वी निवडणूक आयोगाने संसदेच्या स्थायी समितीसमोर सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा उल्लेख केला होता. निवडणूक आयोग खासगी उत्पादकांना हे काम देण्याच्या विरोधात आहे. निवडणूक प्रक्रियेवरच्या जनतेच्या विश्वासाला तडा जावू नये, असे आयोगाचे म्हणणे आहे.

त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्सचा तुटवडा कसा पूर्ण करायचा असा यक्ष प्रश्न निवडणूक आयोगाला पडला आहे. यामुळे सध्या तरी एक देश एक निवडणूक धोरण राबवणे कठीण आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

Moto G Stylus 5G झाला लाँच, कमी किंमतीत दमदार फीचर्स

मुंबई: मोटोरोलाने आपला नवा स्मार्टफोन Moto G Stylus 5G लाँच केला आहे. कंपनीने अमेरिकन मार्केटमध्ये…

12 mins ago

एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून बनवा हे ड्रिंक, उन्हाळ्याचा नाही होणार त्रास

मुंबई: उन्हाळा असो वा थंडी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. यामुळे प्रत्येक मोसमात खूप पाणी…

1 hour ago

सिन्नर शहरासह तालुक्याला अवकाळीने झोडपले

नाशिक : सिन्नर : सिन्नर शहरासह तालुका परिसरात अक्षय तृतीयाच्या दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर वातावरण…

2 hours ago

विराट कोहलीला सलामीला उतरवा, टी-२० वर्ल्डकपसाठी सौरव गांगुलीचा रोहितला सल्ला

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४साठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. टी-२० वर्ल्डकपच्या ९व्या हंगामाचा शुभारंभ अमेरिका…

2 hours ago

शरद पवार यांची पुण्यातील सभा रद्द; अवकाळी पावसाचा महाविकास आघाडीला फटका

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय नेत्यांच्या जंगी सभा होत आहेत. पुण्यामध्ये येत्या १३ तारखेला…

3 hours ago