Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीUttarkashi Tunnel Collapsed : अरेरे! मजुरांच्या बचावकार्यात अडथळेच अडथळे; आता करावा लागणार...

Uttarkashi Tunnel Collapsed : अरेरे! मजुरांच्या बचावकार्यात अडथळेच अडथळे; आता करावा लागणार अवकाळीचा सामना

बचावकार्याचा आज सतरावा दिवस

उत्तराखंड : उत्तराखंडच्या (Uttarakhand) उत्तरकाशी येथील सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Silkyara Tunnel) अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. एक नव्हे तर दोन वेगवेगळ्या मार्गांनी या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, आज सतराव्या दिवशीदेखील रेस्क्यू ऑपरेशनला (Rescue operation) यश न आल्याने चिंता वाढली आहे. त्यातच आणखी एक त्रासदायक बाब म्हणजे अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) बचावकार्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बचाव करताना एकामागून एक समस्या येत असल्याचे वास्तव आहे. पूर्वी ड्रिलिंगसाठी आणलेले अमेरिकन मशीन बिघडले आणि आता खराब हवामान नवीन संकटाचे संकेत देत आहे. उत्तराखंडमधील खराब हवामानामुळे बचावादरम्यान नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. येत्या २४ तासांत राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचण येऊ शकते, अशी शक्यताही शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

सध्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी मॅन्युअल आणि व्हर्टिकल ड्रिलिंग अशा दोन मार्गांचा वापर केला जात आहे. ऑगर मशिनने अडथळे निर्माण झाल्यानंतर काल रात्रीपासून मॅन्युअल ड्रिलिंग करण्यात येत आहे. याद्वारे सुमारे ४ ते ५ मीटर खोदले. आता फक्त ५ ते ६ मीटर खोदाईचे काम बाकी आहे. त्याचप्रमाणे बोगद्याच्या वरून व्हर्टिकल ड्रिलिंग सुरू आहे. वरून कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी ८६ मीटर खोदणे आवश्यक आहे. त्यापैकी सुमारे ३६ मीटर खोदकाम करण्यात आले आहे. दरम्यान, आज रात्री उशिरापर्यंत मजुरांना बाहेर काढण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे मजुरांच्या नातेवाईकांना मजुरांसाठी कपडे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर बोगद्याच्या बाहेर रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. बचावानंतर मजुरांना रुग्णालयात नेण्यात येईल. रुग्णवाहिका बोगद्याच्या बाहेर जिथे पोहोचतील तिथे रस्त्याची डागडुजी केली जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -