Saturday, May 4, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : राजकीय विरोधकांवर खोट्या केसेस टाकणं ही उद्धव ठाकरे सरकारची...

Nitesh Rane : राजकीय विरोधकांवर खोट्या केसेस टाकणं ही उद्धव ठाकरे सरकारची फुल टाईम ड्युटी!

आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

मुंबई : ‘राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मुलाखतीनंतर मातोश्रीमध्ये बर्नोलचं प्रमाण फार वाढलं आहे. छातीच्या गोळ्या ज्या एकदा घेतल्या जात होत्या त्या दोनदा घेतल्या जात आहेत. मविआचं सरकार कसं चालायचं? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्याचे प्रमुख या पदाचा वापर फक्त आपले हिशेब चुकते करण्यासाठी कसा करायचे, या सगळ्याचं सत्य एकनाथ शिंदेंनी आपल्या मुलाखतीतून सांगितलं. त्यामुळे मातोश्रीवर हे चित्र आहे’, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आरोप असल्याचा खोटा दावा करणाऱ्या संजय राऊत (Sanjay Raut) व उद्धव ठाकरेंचा नितेश राणे यांनी खरपूस समचार घेतला.

नितेश राणे म्हणाले, यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम राऊतने म्हटलं की मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो. म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा सरकारचा निर्णय वाटतो? उद्धव ठाकरेच विरोधकांवर चुकीचे कलम लावून त्यांना अटक करा, असे आदेश द्यायचे हे सांगायची हिंमत का होत नाही? गिरीश महाजनजी, प्रविण दरेकरजी, प्रसाद लाडजी किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या सगळ्या राजकीय विरोधकांना कुठल्याही प्रकारे अटक करायची हे उद्धव ठाकरे सरकारचं २४ तास काम असायचं, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे विरोधकांबरोबर हिशोब चुकते करण्यापलीकडे, त्याच्या मुलाने बॉलीवूडमध्ये पार्ट्या करण्यापलीकडे आणि वैभव चेम्बर्समध्ये भ्रष्टाचार करण्यापलीकडे, पैसे कमावण्याच्या बैठका घेण्यापलीकडे काहीही केलं नाही. ते म्हणतात की देवेंद्र फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता, रश्मी शुक्ला मॅडमसंदर्भात. खरं तर खोटे गुन्हे कसे तयार करायचे, यावर उद्धव ठाकरेंनी आता पीएचडी केली पाहिजे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

फडणवीस साहेबांना अटक करायची हिंमत जर उद्धव ठाकरेने केली असती तर उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर कसे पडले असते, हे आम्ही पाहिलं असतं, असं नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले, फोन टॅपिंगबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर आम्ही पण ऐकलं आहे की, मातोश्रीमध्ये रश्मी ठाकरे यांनी आयटीची दोन-तीन मुलं बसवून ठेवली होती. त्यांच्या आदेशावरुन असंख्य विरोधकांचे फोन हॅक व्हायचे. त्यामुळे उगाच आमच्या नेत्यांच्या नावाने खडी फोडण्यापेक्षा तुझ्या मातोश्रीवरच्या मालकिणीला आवर, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -