Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : खरा खुनी काल विधानसभेत दिसला!

Nitesh Rane : खरा खुनी काल विधानसभेत दिसला!

दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आमदार नितेश राणे कडाडले

संजय राऊतांवरही केला हल्लाबोल

नागपूर : दिशा सालियन मृत्यूप्रकरणाने (Disha Salian Death) महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणी राज्य सरकारने मुंबई पोलिसांना आजच एसआयटी (SIT) समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि भाजप कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यासह अनेक आमदारांनी या प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) गंभीर आरोप केले आहेत. यात आदित्य ठाकरे अडचणीत सापडणार आहेत. कारण एसआयटी समितीदेखील लवकरच आदित्य ठाकरेंची कसून चौकशी करणार आहे, यातून सगळी सत्यता बाहेर पडणार आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आज नागपूर विधानसभा परिसरात आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. आदित्य आणि त्यांना समोरा समोर बोलवण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “आम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी टाकली आहे. जो खरा खुनी आहे तो काल विधानसभा परिसरात दिसला त्याच्यावर लवकर कारवाई होईल.”

पुढे नितेश राणे म्हणाले, “काल खरा खुनी आपल्या वडिलांसोबत आला होता. सर्वांची उत्तरं या निमिताने बाहेर येणार आहेत. मी देखील थांबलो आहे. एसआयटी स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत मलादेखील बोलवा. आदित्य आणि मला समोरासमोर बोलवा”, असं ओपन चॅलेंज नितेश राणे यांनी दिलं आहे.

अडीच वर्षांत काय गोट्या खेळत होते?

आदित्य ठाकरेला पोहोचवा असंच संजय राऊतला वाटतंय. अडीच वर्षे त्यांचं सरकार होते तेव्हा हे काय गोट्या खेळत होते. अनिल परब स्वतः म्हणाले १३ जूनला पार्टी होती. त्यांना देखील एसआयटी चौकशीत बोलवावे. दोन वेळा क्लोजर रिपोर्ट बदलला आहे. आयोगाला अनिल परब यांचे मालवणीत फोन येत होते की साक्ष बदला, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला. तुझ्या मालकाचे सरकार होते तेव्हा नागपूर, ठाणे महापालिकेत चौकशी का लावली नाही? खिचडी खाल्ली, मातोश्री चालवली ना? मग आता चौकशीला सामोरे जा, असंही नितेश राणे म्हणाले.

संजय राऊत मागासवर्गीय आयोगात चहा द्यायला जातो का?

भुजबळांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, संजय राऊत मागासवर्गीय आयोगात चहा द्यायला जातो का? राज्य सरकार म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार. संजय राऊतसारखे खिचडी चोर छगन भुजबळ नाहीत. संजय राऊत तुझी केस वेगळी आहे भुजबळ यांची वेगळी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -