Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीशिंदे सरकारचे नऊ मोठे निर्णय : नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड

शिंदे सरकारचे नऊ मोठे निर्णय : नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड

मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. या बैठकीत नऊ निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली.

या बैठकीत पेट्रोल डिझेल दर कपात, नगराध्यक्ष, सरपंच थेट निवड यासह नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान यासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय…

1. पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय (वित्त विभाग)

2. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान” राबवण्यात येणार (नगर विकास विभाग)

3. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबवणार (नगर विकास विभाग)

4. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार (नगर विकास विभाग)

5. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा (ग्रामविकास विभाग)

6. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवणार

7. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा. (ग्रामविकास विभाग)

8. बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मध्ये सुधारणा (पणन विभाग)

9. आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दिनांक 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली) योजना पुन्हा सुरु करणार (सामान्य प्रशासन विभाग)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -