Tuesday, May 21, 2024
Homeकोकणरायगडनेरळ - माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून रुळावर!

नेरळ – माथेरान मिनी ट्रेन उद्यापासून रुळावर!

मात्र फेऱ्या कमी केल्याने पर्यटक नाराज

कर्जत (वार्ताहर) : देशी आणि परदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ – माथेरान मिनिट्रेन २२ ऑक्टोबर पासून पुन्हा रुळावर धावणार आहे. तब्बल तीन वर्षानंतर नेरळ ते माथेरान दरम्यान मिनीट्रेन धावणार असल्याने सर्व स्तरातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या ट्रेनच्या फेऱ्या कमी केल्या असल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर सध्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू आहे.

२०१९ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नेरळ ते माथेरान दरम्यानच्या डोंगर भागातून जाणाऱ्या मिनिट्रेनच्या रुळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पावसामुळे खाडीसह रुळही वाहून गेले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नेरळ ते माथेरान मिनिट्रेनची सेवा बंद करण्यात आली होती. तर प्रवासी, पर्यटक आणि स्थानिकांच्या सोयीसाठी अमन लॉज ते माथेरान दरम्यान शटल सेवा सुरू आहे.

नेरळ ते माथेरान मार्गावर आता नवीन रूळ, खडी तसेच अन्य कामे केली आहेत. नेरळ ते अमन लॉज दरम्यान २० किलोमीटरच्या नवीन रुळांचे काम करण्यात आले आहे. अपघात होऊ नये म्हणून रुळांच्या बाजूला सुरक्षित उपाययोजनाही केल्या आहेत. रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होताच चाचणी देखील सुरू करण्यात आली होती.

माथेरान मिनिट्रेन सुरू होणार असल्याने पर्यटकांसह स्थानिकांनी स्वागत केले आहे. सध्या नेरळ -माथेरान ते माथेरान -नेरळ फक्त दोनच फेऱ्या होणार असल्याने पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या फेऱ्या वाढवताना शटल सेव फेऱ्यांना मात्र कात्री लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे पर्यटक व स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही ट्रेन नेरळ वरून सकाळी ८. ५० व दुपारी २. २० वाजता धावेल. तर माथेरान ते नेरळ करिता दुपारी २. ४५ व संध्याकाळी ४. २० असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -