Tuesday, May 21, 2024
Homeदेशनारायण राणे आज आसाम दौऱ्यावर

नारायण राणे आज आसाम दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे गुरुवारी (१८ नोव्हेंबर) आसाम दौऱ्यावर आहेत. गुवाहाटीमध्ये होणाऱ्या ‘संपर्क, संवाद, समन्वय’ परिषदेचे (नॉर्थ-ईस्ट एमएसएमइ कॉन्क्लेव्ह) केंद्रीय मंत्री राणे यांच्या हस्ते उद्घाटन होईल.

त्यानंतर राणे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हिमांता दास बिस्व शर्मा यांची प्रमुख उपस्थिती असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या निर्माण विकासातर्गत ईशान्य भारतात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाला बळकटी देण्यासाठी तसेच युवा आणि प्रतिभावंत व्यावसायिक आणि उद्योजकांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळण्यादृष्टीने नॉर्थ-ईस्ट एमएसएमइ कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -