Saturday, May 4, 2024
Homeताज्या घडामोडीSangli Lok Sabha : सांगलीत बंडखोरी करणार्‍या विशाल पाटलांवर मविआचा दबाव

Sangli Lok Sabha : सांगलीत बंडखोरी करणार्‍या विशाल पाटलांवर मविआचा दबाव

निलंबनाची कारवाई करण्याचा दिला इशारा

सांगली : महाविकास आघाडीतल्या वादामुळे सांगली लोकसभेची (Sangli Lok Sabha) जागा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. या ठिकाणी ठाकरे गटाने (Thackeray group) कोणत्याही सल्लामसलतीशिवाय आपला उमेदवार जाहीर केला. त्यामुळे काँग्रेसचे (Congress) नेते अत्यंत नाराज झाले. मात्र, अंतिम जागावाटपातही ही जागा ठाकरे गटाकडेच राहिली. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या समर्थनार्थ अनेक कार्यकर्ते उभे राहिले आहेत. याचा धक्का मविआला पोहोचणार असून निवडणुकीत सांगलीमध्ये मविआचं नुकसान होणार आहे. त्यामुळे मविआने विशाल पाटलांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात बंड कराल तर निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा प्रदेश काँग्रेस समितीने विशाल पाटील यांना दिला आहे. विशाल यांच्या माघारीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून काँग्रेसवर प्रचंड दबाव टाकला जात आहे. दिल्लीतील काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्वही आमदार विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या माध्यमातून त्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे.

विशाल पाटील यांच्या बंडामुळे सांगलीची निवडणूक खासदार संजय पाटील (Sanjay Patil) विरुद्ध विशाल पाटील अशी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घडामोडीत अद्याप सांगली काँग्रेसने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही. राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते चंद्रहार यांच्यासोबत दिसत असले तरी, ग्राउंडवरील काँग्रेस कार्यकर्ते विशाल यांच्या प्रचारात उतरल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते चंद्रहार यांच्या प्रचारापासून चार हात दूर आहेत. त्यामुळे मविआसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

मतदारसंघातील बहुतांश काँग्रेस नेते आणि कार्यकर्तेही विशाल यांच्या प्रचारात उघड किंवा गुप्तपणे उतरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी सांगलीत विशाल यांची माघार हा कळीचा मुद्दा बनवला आहे. प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटील यांच्याशी संपर्क साधत त्यांनी फेरविचार करावा, अन्यथा पक्षशिस्त भंग केल्याच्या प्रकरणी निलंबनाची कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला आहे. मात्र, विशाल पाटील यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरपारची लढाई करावी, असे आवाहन आज दिवसभर त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना भेटून केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -