Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबईत घातपाताची शक्यता! पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध

मुंबईत घातपाताची शक्यता! पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध

मुंबई : मुंबईमध्ये अचानकपणे कडक निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक पत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.

पोलिसांच्या आदेश पत्रात म्हटल आहे की, मुंबईतील सार्वजनिक शांतता बिघडवण्याचा आणि जनजीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा काही घटना घडवण्याची शक्यता गुप्त खबऱ्यांकडून मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी ११ जूनपर्यंत पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, लग्न समारंभ, शोकसमारंभ, कोऑपरेटिव्ह सोसायटी–संस्थाचे कार्यक्रम, चित्रपटगृह–नाट्यगृह, दुकाने, व्यवसायाची ठिकाणे यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती बेकायदेशीररित्या एकत्र येण्यावर प्रतिबंध आणण्यात यावे, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. ११ जूनपर्यंत शहरात हा आदेश लागू राहणार आहे.

मुंबई शहरातील शांतता टिकून राहणे, मुंबईमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या हेतूने हा आदेश जारी करण्यात आल्याचे या पत्रात सांगण्यात आले आहे. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्याची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोहोचवण्याचे आवाहन केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -