Monday, May 13, 2024
Homeताज्या घडामोडीमुंबादेवी मंदिराचा होणार कायापालट

मुंबादेवी मंदिराचा होणार कायापालट

मुंबई : मुंबईची आद्यदेवता मानल्या जाणाऱ्या मुंबादेवी मंदिराचा कायापालट करून पुरातन काळातील मंदिराचा अनुभव भक्तांना देण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला आहे. ९,००० स्क्वेअर मीटरमध्ये पसरलेल्या या मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २२० कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली आहे.

मंदिराच्या पुनर्विकासाकरिता बेसॉल्ट सारख्या नैसर्गिक साहित्यांचा वापर करण्यात येणार असून मुंडन समारंभ आणि हवन अशा धार्मिक विधींसाठी विशिष्ट जागा तयार केल्या जाणार आहेत. भाविकांमुळे होणाऱ्या गर्दीचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी अधिक जागा तयार केली जाईल. तसेच मंदिराच्या आवारात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना पाय धुण्यासाठी पायधोनी तलाव बांधण्यात येणार आहे.

मंदिराचे प्रकल्प एजीएच आरबीव्ही डिझाइनचे प्रमुख डॉ. असीम गोकर्ण हरवंश करणार असून प्रकल्पादरम्यान अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सवांच्या काळात, बसण्याची जागा, विश्रांतीची जागा, पार्किंग आणि शौचालये यासारख्या सुविधा नसल्यामुळे खराब होणारे रस्ते दुरुस्त करण्यासाठी, प्रकल्पात काळबादेवीपासून ३० फुटांचे प्रवेशद्वार, बसण्याची जागा आणि ज्येष्ठांसाठीच्या तरतुदी, नर्सिंग रूम, स्वच्छतागृहे, पदपथ आणि मंदिराच्या उद्यानांची कल्पना करण्यात आली आहे.

मंदिराच्या आजुबाजुचा गजबजलेल्या परिसरामुळे मंदिर व्यापले गेले आहे. चारही बाजूंनी अतिक्रमण झाल्याने मंदिराच्या वातावरणाशी तडजोड झाली आहे. तरीही, सर्व दुकाने आणि परवानाधारक फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -