Saturday, May 18, 2024
Homeमहामुंबईमध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांनी सर केले ‘माउंट नुन’

मध्य रेल्वेच्या गिर्यारोहकांनी सर केले ‘माउंट नुन’

मुंबई (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या एका गिर्यारोहक गटाने नुकतीच हिमालयातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट नुन सर केला. या पर्वतारोहण मोहिमेला २९ जुलै २०२२ रोजी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त हिरवा झेंडा दाखवून माऊंट नुनवर चढाई करण्यासाठी रवाना केले होते.

अनिल कुमार लाहोटी, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, संघाचे अभिनंदन करताना म्हणाले, “सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या ४ गिर्यारोहकांच्या चमूने पूर्व हिमालय पर्वतरांगांतील नुन-कुन पर्वताचे सर्वोच्च शिखर माउंट नुन (७१३५ मीटर) यशस्वीरित्या सर केले. यातून संघातील गिर्यारोहकांचे खरे धैर्य, दृढनिश्चय आणि हिम्मत दर्शविते. सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या चार सदस्यीय गिर्यारोहण संघाचे नेतृत्व मुंबई विभागातील अभियांत्रिकी शाखेत कार्यरत मुख्य कार्यालय अधीक्षक हेमंत जाधव आणि सेंट्रलाइज्ड इलेक्ट्रिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ठाकुर्ली येथील कार्यालय अधीक्षक संदीप मोकाशी तसेच संतोष दगडे व धनाजी जाधव यांनी केले. त्यांनी २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता ७,१३५ मीटर उंचीचे नुन शिखर यशस्वीरित्या पार केले.

हेमंत जाधव आणि संदीप मोकाशी हे २३,४०९ फूट उंचीचे शिखर सर करणारे पहिले भारतीय रेल्वे कर्मचारी असावेत. मनोज शर्मा, मुख्य प्रशासकीय अधिकारी (निर्माण) तथा अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (सीआरएसए) तसेच सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन (सीआरएसए) संघ यांनी देखील या यशस्वी कामगिरीबद्दल गिर्यारोहक संघाचे अभिनंदन केले.

सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लब तरुणांना ट्रेकिंग आणि किल्ल्यांचे महत्वमूल्य समजावे याकरिता महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर मोहिमेचे आयोजन करते. या व्यतिरिक्त, त्यांनी अनेक बचाव मोहिमा पार पाडल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी अनेकांचे प्राण वाचवले आहेत. ही टीम आपत्ती झोनमध्ये मदत करणे, सायकलिंग मोहिमेचे नियोजन करणे आणि लोकांना सायकलिंगच्या महत्त्वाबद्दल शिक्षित करणे यासारख्या विविध उपक्रमांमध्ये कार्यरत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -