Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रठाणेमीरा - भाईंदर मॉडेल शहर होणार : एकनाथ शिंदे

मीरा – भाईंदर मॉडेल शहर होणार : एकनाथ शिंदे

अनिल खेडेकर

भाईंदर : मुंबई शहराला लागूनच तसेच मुंबई आणि ठाणे शहराच्या मध्ये असलेल्या निसर्गरम्य मीरा भाईंदर शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे, मुख्यमंत्री या नात्याने राज्याचा सर्वांगिण विकास करताना मीरा भाईंदर हे मॉडेल शहर झाले पाहिजे यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करीन असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मीरारोड येथील भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना केले.

मीरा भाईंदर महापालिकेच्या अनेक विकास कामांच्या भूमिपूजन तसेच उदघाटन कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आमचे सरकार लोकाभिमुख सरकार आहे. जनता हे आमचे ऐश्वर्य असून त्यांच्याशी बांधिलकी आहे, म्हणूनच झटपट निर्णय घेण्यासाठी वेळप्रसंगी आम्ही चालता फिरता मंत्रालय केले. एका महिन्यात ७२ निर्णय घेतले. शेतकऱ्यांसाठी ६ हजार कोटी रुपये दिले, ६० हजार कोटी मेट्रो प्रकल्पासाठी तरतूद केली.

राज्याचा विकास करताना मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे, धोकादायक इमारतीचा प्रश्न, इमारत पुनर्बांधणी, मुबलक पाणी पुरवठा साठी सूर्या धरणातून ४१८ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यासाठी ५१६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. असे सांगून मीरा भाईंदर एक मॉडेल शहर होईल यात शंका नाही, भारतरत्न गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह एक चांगल्या दर्जाचे नाट्यगृह झाले आहे, लता दीदींच्या नावा मुळे या नाट्यगृहाची उंची वाढली आहे.

कार्यक्रमाच्या सुरवातीला नाटकाची घंटा वाजवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृहाचे उदघाटन केले. लता मंगेशकर यांच्या भगिनी उषा मंगेशकर सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या, परंतू पुण्यातील पुर्व नियोजित कार्यक्रमामुळे त्या येवू शकल्या नाहीत त्यांनी पाठविलेला संदेश वाचून दाखविण्यात आला. तसेच महापालिकेच्या कामाची ध्वनी चित्रफित दाखविण्यात आली. तसेच महाराणा प्रताप आणि चिमाजी आप्पा यांच्या भगिनी ई उदघाटन मुख्यमंत्र्यांनी केले. तत्पूर्वी मीरा रोड येथील रुग्णालयाचे आणि घोडबंदर येथिल नविन महानगरपालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आयुक्त दिलिप ढोले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आमदार प्रताप सरनाईक, गीता जैन, पराग शहा, माजी आमदार रविंद्र फाटक, खासदार राजेंद्र गावित, माजी खासदार संजीव नाईक यासह विविध मान्यवर उस्थितीत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -