Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीकाश्मीरमधल्या मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार

काश्मीरमधल्या मार्तंड सूर्यमंदिराचा होणार जीर्णोद्धार

काश्मिरी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना…

श्रीनगर : देशभरातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता आठव्या शतकातील वास्तुकलेचे अद्भूत उदाहरण असलेल्या मार्तंड सूर्यमंदिराचाही जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीरच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा पुरावा म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.प्रशासनाने २७ मार्च रोजी एक अध्यादेश जारी करून सांगितले की, दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मार्तंड सूर्यमंदिराची सुरक्षा, संरक्षण आणि जीर्णोद्धार करण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश संस्कृती विभागाला देण्यात आले आहेत.

सम्राट ललितादित्य मुक्तापीड मूर्ती स्थापन करण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. ललितादित्य मुक्तापिद यांनीच आठव्या शतकात मार्तंड सूर्य मंदिर बांधले होते. मात्र त्यानंतर आलेल्या मुघल साम्राज्यात त्या मंदिरातील पूजा बंद झाली हाेती. त्यानंतर काळाच्या ओघात मंदिराच्या भिंतीची माेठ्या प्रमाणात पडझड झाली. आता या मंदिराचा जीर्णोद्धार हाेणार आहे.

मंदिराचे वैशिष्ट्य :

मार्तंड सूर्यमंदिर हे काश्मिरी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमूना आहे. हे मंदिर पठाराच्या शिखरावर असून चिनी परंपरेतील घटकांचीही वास्तुशास्त्रीय कला यात दडलेली आहे.

या मंदिरात एक भव्य प्रांगण असून त्याच्या मध्यवर्ती मंदिर आहे. तसेच, ८४ लहान देवस्थानांनी हे मंदिरे आहे. हे २२० फूट लांबी आणि १४२ फूट रुंदीचे हे मंदिर आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -