Monday, May 20, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Reservation : नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी!

Maratha Reservation : नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी!

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत आहे. यामुळे नवी मुंबईत वाहनांना बंदी; २६ जानेवारी रोजी रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची (Manoj Jarange) पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. यासाठी २५ जानेवारीला रात्री १२ ते २६ जानेवारीला रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसेच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.

APMC market : एपीएमसी मार्केट उद्या-परवा बंद

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाला असून आज तो लोणावळ्याकडे कूच करत आहे.

गुरुवार २५ जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -