Monday, May 20, 2024
Homeमहत्वाची बातमीआरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती नको, गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती नको, गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची मागणी

मुंबई: मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मागणी घेऊन मनोज जरांगे यांचे आदोलन वाशीमध्ये पोहोचले आहे. येथे झालेल्या सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी वाशीमध्ये उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी सरकारकडे केलेल्या मागण्याची माहिती दिली.

जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न १०० टक्के निकाली निघत नाही तोपर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती करून नये अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शिक्षण मोफत द्या. तसेच सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र काढण्याचा आदेश द्यावा. यासोबतच आंतरवाली सराटीसह राज्यातील इतर ठिकाणचे गुन्हे मागे घेतल्याचे आदेश काढावेत अशी मागणी जरांगे यांनी सरकराकडे केली आहे.

तसेच आरक्षण मान्य झाल्याशिवाय सरकारने कोणत्याही प्रकारची शासकीय भरती करू नये मात्र भरती करायची असल्यास जागा राखीव ठेवण्यात याव्या असेही जरांगे यांनी सरकारला सांगितले. तसेच या मागण्यांसाठी सरकारने सहमती दर्शवल्याची माहितीही यावेळी जरांगेंनी दिली.

आज संध्याकाळपर्यंत शासनाचा निर्णय अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. जर सरकारकडून अध्यादेश निघाला नाही तर आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या

आंतरवाली तसेच राज्यातील इतर ठिकाणी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. तसेच समाजाच्या शेवटच्या माणसाला आरक्षण मिळत नाही तोवर १०० टक्के शिक्षण मोफत केले जावे अशी मागणीही यावेळी जरांगे यांच्याकडून करण्यात आली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -