Tuesday, May 21, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange Patil : अंतरवालीतील मंडप काढण्याच्या हालचाली; जरांगे छ. संभाजीनगरमधून तडक...

Manoj Jarange Patil : अंतरवालीतील मंडप काढण्याच्या हालचाली; जरांगे छ. संभाजीनगरमधून तडक निघाले…

जालना : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्य सरकारमधील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर उपचारांकरता ते छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे दाखल झाले होते. त्यानंतर सरकारने अंतरवाली सराटीतील आंदोलनस्थळाचा मंडप पोलिसांच्या माध्यमातून काढण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे जरांगेंना समजले आणि ते सलाईन काढून तडक जालन्याच्या दिशेने निघाले.

दरम्यान, अंतरवालीकडे निघालेल्या मनोज जरांगे यांची पोलीस अधिकाऱ्यांनी भेट घेतली. मंडप सध्या तरी हटवण्यात येणार नाही असं आश्वासन पोलिसांनी जरांगे यांना दिलं आहे. पोलिसांच्या आश्वासनानंतर ते थांबले.

मंडपातील एक कापडही काढू देणार नाही : मनोज जरांगे

या प्रकारानंतर मनोज जरांगे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर पुन्हा आक्रमक झाले आहेत. जरांगे म्हणाले, जेलमध्ये सडायला तयार आहे पण अंतरवालीतील मंडपातील एक कापडही काढू देणार नाही. तुमच्या हातातील संधी गेली नाही. तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका. सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा, ओबीसीतून आरक्षण द्या. अंगावार येण्याचा प्रयत्न करु नका. मी हॉस्पीटल सोडलं अन् माझ्या अंगाला जरी धक्का लागला तर बघा. मी मराठा समाजासाठी मान देखील कापून द्यायला तयार आहे. आमचे लोक सरकारने सोडावे. आमच्या मंडपाला, व्यासपीठीला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावणार नाही असा शब्द द्यावा. जर लावाला तर गृहमंत्र्याला सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या अशा पद्धतीच्या भाषेवर सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनीही तीव्र नाराजी दर्शवली असून येत्या काळात हा संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -