आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बंगळुरूतून अटक

Share

मुंबई : शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूतला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला बंगळुरूमधून ताब्यात घेतले आहे. जयसिंग राजपूत हा दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा फॅन असल्याचे सांगत आहे.

बंगळुरूहून अटक करण्यात आलेला आरोपी जयसिंग राजपूत (वय ३४) याने ८ डिसेंबरच्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर संदेश पाठवला होता. त्या संदेशात त्याने ‘सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा’ अशा आशयाचा संदेश राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता. त्या संदेशाला ठाकरे यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर राजपूतने तीन फोनही केले. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचलले होते. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसा संदेश त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीने ठाकरेंना अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली होती.

या प्रकरणी ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला. त्यावेळी आरोपी जयसिंग बंगळुरू येथे असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी त्याला अटक केली.

Recent Posts

Supriya Sule : मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी!

पवार विरुद्ध पवार सामन्यात कोणता नवा ट्विस्ट? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज…

43 mins ago

Akshaya Tritiya 2024 : खूशखबर! अक्षय तृतीयेला सामान्यांच्या हाती सोनं

शुभ दिवशी सोने खरेदीवर मिळणार 'ही' विशेष सवलत मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या…

1 hour ago

Rajendra Gavit : राजेंद्र गावित यांची घरवापसी; भाजपामध्ये केला पक्षप्रवेश

पालघरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने होती नाराजी मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) पालघर लोकसभेची (Palghar Loksabha) जागा…

2 hours ago

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला अटक!

राजस्थानमध्ये पोलिसांनी ठोकल्या बेड्या मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार प्रकरणात (Firing…

2 hours ago

Weather Update : तापमान ४४ अंशा पलीकडे जाणार, हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा!

राज्यातील 'या' भागात सूर्याची आग तर काही भागांत पावसाचा यलो अलर्ट मुंबई : देशभरात निवडणुकांचे…

2 hours ago