अयोध्येत ‘महाराष्ट्र सदन’ बांधणार- आदित्य ठाकरे

Share

अयोध्या (हिं.स.) : प्रभू श्रीरामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत महाराष्ट्रातून जाणाऱ्या भाविकांसाठी ‘महाराष्ट्र सदन’ बांधण्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी खा. संजय राऊत आणि निलम गोऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

याप्रसंगी आदित्य ठाकरे म्हणाले की, आमची अयोध्या यात्रा राजकीय नसून आम्ही तिर्थयात्रेवर आलोय. अयोध्येत १०० खोल्यांचे भव्य महाराष्ट्र सदन व्हावे असा आमच्या सरकारचा मनोदय आहे. याबाबत उद्धव ठाकरे उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोलणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक भाविक इथे दर्शनासाठी येतात. त्यांना राहण्यासाठी एक चांगली जागा आपल्याला इथे निर्माण करायची आहे. गेल्या तीन वर्षात आपण शिवसेना कुटुंबासोबत चौथ्यांदा अयोध्येत येत आहोत. पण कार्यकर्त्यांचा जल्लोष तसाच कायम आहे.

आता राम मंदिर निर्माण होत असताना अनेक शिवसैनिक रामजन्मभूमीत आले आहेत. सन २०१८ मध्ये मी पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला आलो होतो. त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती “पहिले मंदिर फिर सरकार”. शिवसेनेच्या या भूमिकेनंतर वेगाने घडामोडी घडल्या, पुढे कोर्टाचा निकाल आला आणि मंदिराचा मार्ग मोकळा झाला, असेही यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी रामललाचे दर्शन घेतले. तसेच इस्कॉन मंदिराला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी इस्कॉन मंदिरात महाप्रसाद घेतला. त्यानंतर त्यांनी हनुमान गडी येथे जाऊन दर्शन घेतले.

Recent Posts

राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा दिवस

भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे मानले जाते आणि या लोकशाहीच्या उत्सवातील निवडणुकीतील तिसऱ्या…

34 mins ago

तिसऱ्या टप्पासाठी आज मतदान

महाराष्ट्रातील ११ जागांसह १२ राज्यांतील ९४ जागांवर उमेदवारांचे भवितव्य आज होणार ईव्हीएममध्ये बंद मुंबई :…

2 hours ago

विवेकानंद वैद्य प्रतिष्ठान, सांगली

सेवाव्रती :शिबानी जोशी सांगलीच्या विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानची स्थापना आणि त्या नंतरच्या सुरुवातीच्या कामाची माहिती आपण गेल्या…

2 hours ago

कोकणात कमळ फुलणार…

विशेष: डॉ. सुकृत खांडेकर रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाकडे सर्व देशाचे लक्ष लागले असून, आज या…

2 hours ago

MI vs SRH: ‘सुर्या’ च्या प्रकाशाने मुंबई झळकली, ७ गडी राखुन हैदराबादवर विजय…

MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने…

3 hours ago

Lok Sabha Elections 2024: तिसऱ्या टप्प्यात अमित शाह,नारायण राणे, उदयनराजे यांची प्रतिष्ठा पणाला

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या(loksabha election 2024) तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी मतदान होत आहे. देशातील १२ राज्ये…

4 hours ago